Ajit Pawar : तर द्रौपदीचा विचार करावा लागेल?

मुलींच्या जन्मदराबाबत अजित पवारांनी सांगितली वस्तुस्थिती


इंदापूर : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मात्र प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी येणाऱ्या काळात द्रौपदीचा (Draupadi) विचार करावा लागेल, असा प्रसंग येऊ शकतो, असे वादग्रस्त विधान करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सध्याची वास्तव वस्तुस्थिती सांगितली.


उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती, दौंड आणि इंदापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यात गर्भपात आणि मुलींच्या जन्मदराबाबत विधान करताना, भविष्यात सगळंच अवघड होणार असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी सरकारी यंत्रणेमधील काही जाचक अटी कमी करण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली होती. यासंदर्भात सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकारी यंत्रणेकडून निश्चित तुम्हाला त्रास होत असेल, काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटरला त्रास दिला जात असेल. परंतु बीडच्या घटना आणि पाठीमागील काळात १००० मुले जन्माला आले की त्यावेळेस ८०० ते ८५० मुली जन्माला येत होत्या. मग हा दर ७९० पर्यंत गेला. हे सर्व पाहता यापुढे द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रश्न पडतो. परंतु हा गंमतीचा भाग झाला. मला कुणाचा अपमान करायचा नाही, परंतु डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांचा शासन दरबारी विचार केला जाईल, असे अजित पवार म्हणाले.


मोदींसारखा माणूस पाहायला मिळत नाही


अजित पवार म्हणाले की, मी विकास करणारा माणूस आहे. मी आजपर्यंत अनेक पंतप्रधान पाहिले. मी मोदींना विरोध करत होतो, पण त्यांच्यासारखा माणूस सारखा सारखा पाहायला मिळत नाही. त्यांनी अनेक कामे केली आहेत. एका बाजूला नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला कोणताही चेहरा नाही. राहुल गांधींचा चेहरा आपण धरला तर काय चित्र दिसतं तुम्हाला? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थितांना विचारला.


तर त्यांना जोरात इंजेक्शन द्या


अजित पवार म्हणाले की, माणूस खरं कोणाशी बोलत असेल तर तो डॉक्टरशी बोलतो. त्यामुळे तुमच्याकडे जर कोणी आलं तर त्यांच्याशी बोला, त्यांना विचारा काय चाललं आहे. जर त्यांनी आमचं नाव घेतलं तर त्यांच्याशी जरा चांगलं बोला आणि जर दुसऱ्याचं नाव घेतलं तर त्यांना जोरात इंजेक्शन द्या, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली.


महायुतीचा खासदार आतापर्यंत निवडून दिलेल्या खासदारांपेक्षा उजवा असेल


यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, आतापर्यंत तुम्ही आमच्या खासदाराला निवडून दिले आहे. त्यामुळे आता महायुतीच्या खासदाराला निवडून द्या. महायुतीचा खासदार आतापर्यंत निवडून दिलेल्या खासदारांपेक्षा उजवा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Pune Crime : हॉटेलच्या बंद खोल्यांत चालले होत 'ते' कांड, पुणे पोलिसांची छापा पडताच खळबळ

पुणे : पुणे (Pune) शहर गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने (AHTC) शिवाजीनगर (Shivaji Nagar) परिसरात मोठी कारवाई करत दोन

ST Bus : बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर लगाम

१५ दिवसांत एसटीच्या उत्पन्नात ४३.८३ कोटी रुपयांची वाढ मुंबई, दि. १८ : राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर

RBI Recruitment 2026 : आरबीआयमध्ये तरुणांना सुवर्णसंधी; दरमहा मिळणार तब्बल १.५ लाखांचा पगार, जाणून घ्या क सा करायचा अर्ज?

मुंबई : देशातील तरुण आणि होतकरू पदवीधरांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक अतिशय सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.

Weather Alert: मान्सूनची प्रतीक्षा कायम! पुढील ४८ तास महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला इशारा

मुंबई : जून (June) महिन्याचा अर्धा टप्पा संपत आला असला तरी महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) अद्याप पूर्णपणे सक्रिय

Baramati Bus Fire : धावत्या बसमधून धूर, अन् काही क्षणांत आग; बारामतीतील थरारक घटना

बारामती : पुण्यातील बारामती (Baramati) तालुक्यातील पणदरे खिंडीत आज सकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. निरा-बारामती

Dhule-Solapur highway : भरधाव कारने दुचाकीला उडवले; १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

आडूळ (ता. पैठण): धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ फाटा येथे बुधवारी (दि. १७) दुपारी भरधाव कारने दुचाकीला