Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीLifestyle

Banana Peel: केळ्याची साल फेकून देताय? थांबा! जाणून घ्या 'हे' दोन अत्यंत महत्त्वाचे फायदे

Banana Peel: केळ्याची साल फेकून देताय? थांबा! जाणून घ्या 'हे' दोन अत्यंत महत्त्वाचे फायदे
मुंबई : केळी हे शरीरासाठी अत्यंत गुणकारक फळ असतं. वजन वाढवणं, फायबर मिळवणं आणि पोटासंबंधी असलेल्या समस्या दूर करण्यासाठी केळी उपयुक्त ठरते. मात्र केळ्याप्रमाणेच केळीची सालही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अनेक जण केळी खाल्ल्यावर त्याच्या साली फेकून देतात. केळ्याची साल फेकून न देता त्याचा असाही वापर केला जाऊ शकतो. वेबएमडीच्या माहितीनुसार, केळी आणि त्याची साल दोघांचेही वेगवेगळे फायदे मिळतात. जाणून घ्या काय आहेत केळ्याच्या सालीचे फायदे.

हे आहेत केळीच्या सालीचे फायदे-



  • तुम्ही दात स्वच्छ करण्यासाठी केळ्याच्या सालीचा वापर करु शकता. केळ्याच्या सालीमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम पिवळ्या दातांची समस्या दूर करण्यास मदत करते. यासाठी रोज दातांवर केळीची सालं चोळा. यामुळे खूप फायदा होईल.

  • त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी केळीच्या सालीचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत, जे त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात.

Comments
Add Comment