Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीChandrayaan 4 : भारत आणि जपानची संयुक्त मोहिम! चांद्रयान-४ च्या तयारीला सुरुवात

Chandrayaan 4 : भारत आणि जपानची संयुक्त मोहिम! चांद्रयान-४ च्या तयारीला सुरुवात

मोहिमेचं नाव ठेवण्यात आलं आहे ‘लुपेक्स’

मुंबई : भारताची अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात चांद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिम यशस्वी केली आणि अख्ख्या जगाने भारताचं कौतुक केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (Moon South pole) लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. चांद्रयान ३ च्या यशानंतर आता आंतरराष्ट्रीय स्पेस एजन्सींनीही इस्रोमध्ये रस दाखवायला सुरुवात केली आहे. इस्रो अनेक मोठमोठ्या व महत्त्वाकांक्षी मोहिमा राबवत आहे. त्यातीलच एक म्हणजे इस्रोने आता आपल्या चांद्रयान-४ च्या तयारीला सुरुवात केली आहे. ही भारत व जपानची संयुक्त मोहिम असणार आहे. त्यामुळे दोन्ही देश या मोहिमेसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत.

भारताची इस्रो (ISRO) म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) आणि जपानची जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (Japan Aerospace Exploration Agency) या दोन्ही संस्था मिळून या मोहिमेची तयारी करत आहेत. या मोहिमेचं नाव ‘लुपेक्स मोहिम’ (Lupex Mission) ठेवण्यात आलं आहे. चांद्रयान-३ ने पाठवलेल्या माहितीच्या आधारे चांद्रयान-४ मोहिमेद्वारे चंद्रावरील पाण्याचे साठे शोधणार आहेत, चांद्रयान-४ या मोहिमेमध्ये चंद्राचे नमुने पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न असणार आहे.

भारत लँडर आणि जपान रोव्हर बनवणार

चांद्रयान-४ मधील लँडर मॉड्युल ISRO बनवणार आहे आणि रोव्हर मॉड्यूल जपानची स्पेस एजन्सी JAXA बनवणार आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ समनीत ठाकूर यांनी NIT हमीरपूरच्या वार्षिक टेक फेस्ट निंबस इव्हेंटमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. दोन आंतरराष्ट्रीय एजन्सी एकत्र काम करत असताना खूप काही शिकायला मिळते. अवकाश विज्ञानाचा वापर सामान्य माणसाच्या जीवनात खूप फायदेशीर आहे. इस्रोच्या ग्रह मोहिमांमध्ये आव्हाने आणि यश दोन्ही आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -