Monday, June 16, 2025

तीन महिन्यांत १६ टक्क्यांनी महागले सोने, या कारणामुळे अचानक वाढल्या किंमती

तीन महिन्यांत १६ टक्क्यांनी महागले सोने, या कारणामुळे अचानक वाढल्या किंमती

मुंबई: सोने हे केवळ दागिन्याच्या रूपात नव्हे तर गुंतवणुकीसाठीही चांगला पर्याय मानला जातो. जेव्हा जागतिक स्तरावर हालचाल वाढते अथवा तणावाची स्थिती निर्माण होते. तेव्हा गुंतवणूकदार सोन्याच्या दिशेने धावतात.


काहीशी अशी स्थिती रशिया-युक्रेन आणि इस्त्रायल-हमास यांच्यानंतर आता इराण-इस्त्रायल युद्धामुळे झाली आहे. या तीन महिन्यात सोन्याच्या किंमती १६ टक्क्यांनी उसळल्या आहेत. त्यामुळे सोन्याचे दर प्रति ग्रॅम ७४ हजार रूपयांवर पोहोचले आहेत.


रिपोर्टनुसार, ३ महिन्यांत १६ टक्क्यांनी दर वाढले आहेत. त्यात गेल्या दीड महिन्यात सोन्याच्या दरात मोठी उसळी आली आहे.


विश्लेषकांनुसार इऱाण-इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर मोठ्या हालचाली निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.

Comments
Add Comment