मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) सोमवारी रंगलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २५ धावांनी हरवले. सनरायजर्स हैदराबादने पहिल्यांदा खेळताना २८७ धावा केल्या होत्या. हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर आहे. तर दुसरीकडे आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीची सुरूवात धमाकेदार झाली. संघाने पॉवर प्लेमध्ये ७९ धावा केल्या होत्या.
विराट कोहलीने २० बॉलमध्ये ४२धावांची खेळी केली तर कर्णधार फाफ डू प्लेसिसचीही बॅट तळपली. डू प्लेसिसने ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २८ बॉलमध्ये ६२ धावा केल्या. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरून ग्रीन नवहे. यामुळे खालच्या फळीतील फलंदाजीची जबाबदारी दिनेश कार्तिक आणि युवा फलंदाजांवर आली. दिनेश कार्तिकनेही ३४ बॉलमध्ये ८३ धावा तडकावल्या. मात्र तो आरसीबीला विजय मिळवून देऊ शकला नाही.
१५ षटकानंतर आरसीबीच्या ६ बाद १८७ धावा झाल्या होत्या. शेवटच्या ३० बॉलमध्ये त्यांना आणखी १०१ धावांची गरज होती. पुढील २ ओव्हरमध्ये धावा झाल्या. त्यानंतर आणखी १८ बॉलमध्ये ७२ धावा हव्या होत्या. बंगळुरूला प्रत्येक बॉलमध्ये चौकार हवा होता. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये संघाला विजयासाठी ५८ धावा हव्या होतीय. कार्तिकने १९व्या षटकांत १४ धावाकेल्या. मात्र त्याच ओव्हरमध्ये तो बाद झाला. यामुळे हैदराबादचा विजय निश्चित झाला होता. हैदराबादने हा सामना २५ धावांनी जिंकला.
सामन्यात बनल्या ५४९ धावा
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकच सामना असा राहिला ज्यात ५३०हून अधिक धावा झाल्या. आयपीएल २०२४मध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील सामन्यात ५२३ धावा बनल्या होत्या. आता हा रेकॉर्डही या सामन्याने मोडीत काढला. हैदराबाद आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यात एकूण ५४९ धावा झाल्या.