Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीNargis Fakhri : बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी नर्गिस फाखरीला 'हे' व्हायचं होत!

Nargis Fakhri : बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी नर्गिस फाखरीला ‘हे’ व्हायचं होत!

मुंबई : ‘रॉकस्टार’ ते ‘मैं तेरा हिरो’ पर्यंत अभिनेत्री नर्गिस फाखरीने (Nargis Fakhri) बॉलिवूडमधील तिच्या संपूर्ण प्रवासात काही हिट चित्रपट दिले आहेत. ‘रॉकस्टार’ मुलीने ‘मद्रास कॅफे’, ‘अझहर’ आणि ‘हाऊसफुल ३’ सारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करून अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध केलं आहे. ती बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिच्यासाठी करिअरची वेगळी निवड कोणती होती हे नर्गिसने स्वतःच उघड केले आहे.

या बद्दल सांगताना नर्गिस म्हणते, “मला लहानपणीच पशुवैद्य बनायचे होते. माझं प्राण्यांवरच प्रेम आणि माझ्या लहानपणापासूनच त्यांचा सोबतचं नातं हे सुंदर आहे, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि मी चित्रपटसृष्टीत आले. चित्रपसृष्टीत आले नसते तर नक्कीच मी पशुवैद्यकीय शिक्षण घेऊन या विश्वात काहीतरी केलं असतं. वैविध्यूर्ण भूमिका साकारून आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी मला मिळाली आहे तर कायम प्रेक्षकांना काय मोहित करून जाईल याकडे माझा कल आहे.”

अलीकडेच ‘मैं तेरा हिरो’ रिलीज होऊन १० वर्षे पूर्ण झाल्यामुळे नर्गिस फाखरीने जुन्या आठवणींना उजाळा दिला. वर्क फ्रंटवर नर्गिस शेवटची ‘ततलुबाज’ मध्ये दिसली होती. आगामी काळात तिच्याकडे अनेक मनोरंजक प्रकल्प येत आहेत ज्यांची घोषणा या वर्षाच्या शेवटी होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -