Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीWeight Loss: कठोर मेहनत करूनही वजन कमी होत नाहीये? ट्राय करा या...

Weight Loss: कठोर मेहनत करूनही वजन कमी होत नाहीये? ट्राय करा या गोष्टी

मुंबई: वजन कमी करणे काही सोपे नसते. यासाठी कठोर मेहनत आणि योग्य डाएट घेण्याची गरज असते. वेट लॉसचा हा प्रवास सोपे बनवतात शेंगदाणे. यांचे सेवन एखाद्या प्रोटीन शेकपेक्षा कमी नसते. यामुळे पटापट वजन कमी होण्यास मदत होते. याच कारणामुळे अधिकतर जीम ट्रेनर पीनट बटर खाण्याचा सल्ला देतात.

शेंगदाण्यामध्ये प्रोटीनशिवाय हेल्दी फॅट्स आणि फायबरचे प्रमाण चांगले असते. यात आर्यन, फोलेट, कॅल्शियम आणि झिंक असतात.हाय प्रोटीन डाएट असल्याने क्रेविंग कंट्रोल करण्यास मदत होते. यामुळे वेट लॉस होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यात शेंगदाणे फायदेशीर

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार वेट लॉस जर्नीला शेंगदाणे सोपे बनवते. यातील हाय प्रोटीन शरीराला एनर्जी देऊन क्रेविंग कंट्रोल करतात आणि एक्स्ट्रा कॅलरीजपासून बचाव करतात. यात फायबर चांगल्या प्रमाणात असते. यामुळे बराच वेळ भूक लागत नाही. तसेच पाचनशक्तीही सुधारते. शेंगदाण्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात.

कसे कराल सेवन

पीनट बटर

पीनट बटर हे क्रीमी आणि पातळ असते. यात ९० टक्के शेंगदाणे असतात तर उरलेल्या १० टक्क्याम्ये चवीसाठीचे पदार्थ आणि बटर मिसळलेले असते. यातही व्हेजिटेबल ऑईल, मीठ, डेक्सट्रोज आणि कॉर्न सिरप असते.

पीनट ऑईल

वेट लॉस करण्यासाठी पीनट ऑईलही फायदेशीर आहे. यात फॅटी अॅसिडचे प्रमाण इतर ऑईलच्या तुलनेत संतुलित असते. यामुळे फॅट वाढत नाही.

भाजलेले शेंगदाणे

जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर भाजलेले शेंगदाणे खावेत. वजन कमी करण्यासाठी साधे भाजलेले शेंगदाणे खाल्ल्यास अधिक फायदा होतो. याशिवाय तुम्ही शेंगदाणे घातलेले पोहे खाऊ शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -