Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

Thackeray Vs Shinde : जळगावात ठाकरे गटाला भगदाड! पदाधिकाऱ्यांसह ४०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Thackeray Vs Shinde : जळगावात ठाकरे गटाला भगदाड! पदाधिकाऱ्यांसह ४०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचाही समावेश


जळगाव : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गटाला (Thackeray Group) मात्र धक्क्यांवर धक्के सहन करावे लागत आहेत. शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यापासून कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडे वाढता ओघ अजूनही सुरुच आहे. त्यामुळे ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेत नाही. त्यातच आता ठाकरे गटाला जळगावातही (Jalgaon News) मोठं भगदाड पडलं आहे. जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह ४०० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत काल रात्री हा पक्षप्रवेश पार पडला.


जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व चोपडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील जवळपास ४०० कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा शिवसेनेत प्रवेश केला. बुलढाणा येथील बुलढाणा रेसिडेन्सी क्लब येथे हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते. हे सर्व कार्यकर्ते जवळपास ६० ते ७० वाहनांतून बुलढाण्यात पोहोचले होते.



शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही निवडणुकीत गुंतलो असलो तरी मी दररोज सकाळी माहिती घेतो. त्याप्रमाणे मी मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतो. त्यांना सूचना देतो की, तात्काळ पंचनामे करा हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागरूक आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना नुकसान भरपाई मिळेल.


Comments
Add Comment