Monday, December 2, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेSanjay Raut : घोटाळेबहाद्दर संजय राऊत मनोरुग्ण!

Sanjay Raut : घोटाळेबहाद्दर संजय राऊत मनोरुग्ण!

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवरील टीकेवरून शिवसेनेचा पलटवार

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी आणि कोरोना काळातील रुग्णांच्या खिचडी पुरवठ्यातील गैरव्यवहाराचा लाभार्थी असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन’च्या रुग्णसेवेवर केलेली टीका हास्यास्पद आहे. फाऊंडेशनच्या कामाची आणि व्यवहारांची सविस्तर माहिती धर्मादाय आयुक्तांकडे उपलब्ध आहे. माहितीच्या अधिकारीत ती सहज मिळू शकते. परंतु, तसे न करता बिनबुडाचे आरोप मानसिक संतुलन ढासळलेली व्यक्तीच करू शकते. त्यांच्यावर फाऊंडेशनच्या माध्यमातून उपचार करायला आम्ही तयार आहोत असे प्रत्युत्तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.

गोरेगाव येथील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पातील १ हजार ३९ कोटींचा घोटाळा प्रकरणात संजय राऊत आरोपी आहे. या प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना संजय राऊत यांनी बलात्कार आणि हत्येची धमकी दिली होती. त्याप्रकरणातही राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना खिचडी पॅकेट पुरवण्याचे कोट्यवधींचे कंत्राट राऊत यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला मिळवून दिले होते. त्या घोटाळ्यातील जवळपास ६० लाखांची रक्कम राऊत यांचे भाऊ, कन्या आणि पत्नीच्या बँक खात्यात कमिशन म्हणून जमा झाले आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे अलिबागमधील ८ भूखंड ईडीने यापूर्वीच जप्त केले आहेत. अशा असंख्य घोटाळ्यांशी संजय राऊत यांचा थेट संबंध असून त्यातले पाच पैसे तरी कुठल्या सामाजिक कार्यासाठी त्यांनी कधी दिले आहेत का, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊन यांनी आपल्या पत्रात फाउंडेशनने आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे कौतुकही केले आहे. त्याचवेळी या कामावर टीकाही केली आहे. एकाच पत्रात कौतुक आणि आरोप करणारे मनोरुग्णच असू शकतात. फाऊंडेशनने आजवर अनेक मुलांना नवजीवन दिले आहे. त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंद फुलवला आहे. राऊतांच्या असल्या टीकेमुळे फाऊंडेशनच्या कामात कुठलंही विघ्न येणार नाही. आम्ही ते काम अधिक जोमाने करू, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -