
मुंबई: रामनवमीच्या दिवशी १७ एप्रिलला बुधवारी अयोध्येतील राम मंदिरात भक्तांना १९ तास दर्शनासाठी मिळणार आहेत. दिवसभरात केवळ ५-५ मिनिटांसाठी मंदिर बंद राहील. त्यानंतर पुन्हा प्रभू श्री रामांचे दर्शन होणार आहे. राम मंदिर ट्रस्टकडून ही माहिती देण्यात आली आह.
या दिवशी श्रीरामांची विधिवत पूजा आणि दर्शन सुरूच राहणार आहे. देवाला नैवेद्य अर्पण करतेवेळी काही काळ मंदिराचे कपाट बंद राहील. दरम्यान, रात्री ११ वाजेपर्यंत श्रीरामांचे दर्शन सुरू राहणार आहे.
१६, १७, १८ आणि १९ एप्रिलला सुगम दर्शन पास, व्हीआयपी दर्शन पास, मंगला आरती पास, श्रृंगार आरती पास बनणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे पास जारी केले जाणार नाहीत. इतर दिवशी सर्व सुविधा सुरू राहतील. दर्शनाची वेळ वाढवून १९ तास करण्यात आली आहे. मंगल आरतीपासून प्रारंभ होऊन रात्री ११ वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील.
८० ते १०० ठिकाणी एलईडी स्क्रीनवर होणार लाईव्ह
श्रीरामांच्या जन्मभूमीत संपन्न होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे लाईव्ह प्रसारण अयोध्या नगर निगम क्षेत्रातील साधारण ८० ते १०० ठिकाणी एलईडी स्क्रीनवरून दाखवले जाणार आहे.