
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पाठोपाठ बीआरएसच्या नेत्या के कविता (K Kavita) यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली. तसेच त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ झाली आहे.
दिल्ली कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, के कविता यांना २६ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांना याआधी सीबीआयकडून १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे. दिल्ली कोर्टात आज झालेल्या सुनावणीमध्ये हा महत्वाचा निर्णय देण्यात आला आहे.
कोर्टातून बाहेर येत असताना के कविता यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली. के कविता म्हणाल्या, ही सीबीआयची कोठडी नाही तर ही भाजपाची कोठडी आहे. भाजप जे काही बाहेर बोलते तेच सीबीआय मला आतमध्ये विचारत आहे. तसेच मागील दोन वर्षांपासून मला तेच प्रश्न विचारले जात आहेत. नवीन काही नाही, असे के कविता म्हणाल्या.