
मुंबई: रोहित शर्माने आयपीएल २०२४मधील २९व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी शतक ठोकले. दरम्यान, त्याचे शतक चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळवून देऊ शकले नाही. रोहितने ६३ बॉलमध्ये ११ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०५ धावांची खेळी केली. भले मुंबईला या सामन्यात विजय मिळाला नसला तरी हिटमॅनच्या शतकाने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले.
असाच फिल्डिंगदरम्यान प्रेक्षकांना जोरजोरात हसण्याची संधी रोहितकडून मिळाली. फिल्डिंगदरम्यान बॉल पकडण्यासाठी पळताना रोहित शर्माची पँटच खाली आली. ते पाहून ऱितिकाला मात्र कसेनुसे झाले.
लाईव्ह सामन्यादरम्यान रोहित शर्माची पँट खाली आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार कॅच घेण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. १२व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने लेग साईडच्या दिशेने शॉट खेळला.
View this post on Instagram
या दिशेला रोहित शर्मा फिल्डिंग करत होता. बॉल हवेत गेलेला पाहून रोहित शर्मा कॅच घेण्यासाठी धावला. मोठे प्रयत्न करूनही तो कॅच पकडू शकला नाही मात्र या दरम्यान त्याची पँटच खाली घसरली. रोहित शर्माच्या या मोएमोए मूमेंटवर वाईफ रितीकाची रिअॅक्शनही समोर आली आहे. ती स्टँड्समध्ये बसून सामना पाहत होती.