Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीX Account: एक महिन्यात सस्पेंड झाले २ लाखाहून अधिक अकाऊंट, एक्सने भारतात...

X Account: एक महिन्यात सस्पेंड झाले २ लाखाहून अधिक अकाऊंट, एक्सने भारतात बनवला रेकॉर्ड

मुंबई: एलन मस्कच्या सोशल मीडिया कंपनी एक्सने भारतात एक अनोखा रेकॉर्ड बनवला आहे. हा रेकॉर्ड एक महिन्याच्या अंतराने लाखो अकाऊंट बॅन करत बनवला गेला आहे. एक्सने हा रेकॉर्ड केवळ एका महिन्यात २ लाखाहून अधिक अकाऊंटवर अॅक्शन घेत बनवले आहे.

एका महिन्यात सस्पेंड झाले इतके अकाऊंट

आधी ट्विटरच्या नावाने प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला ऑपरेट आणि मॅनेज करणारी कंपनी एक्स कॉर्पोरेशनने आपल्या महिन्याच्या रिपोर्टमध्ये या कारवाईबद्दल माहिती दिली. कंपनीने सांगितले की त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील नियामांचे विविध उल्लंघन केल्याप्रकरणी मार्च महिन्यात २ लाख १२ हजार ६२७ अकाऊंट बॅन करण्यात आले.

या कारणामुळे केली गेली कारवाई

जे अकाऊंट बंद करण्यात आले. त्यात अनेक मुलांसोबतच लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणारे होते तसेच परवानगीशिवाय न्यूडिटी पसरवत होते. याशिवाय भारतीय सायबर स्पेसमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्यामुळे अनेक अकाऊंटवर कारवाई करण्यात आली. एक्सने सांगितले त्यांच्या २०२१च्या नव्या आयटी नियमांची अंमलबजावणी करताना संबंधित अकाऊंटवर कारवाई कऱण्यात आली आहे.

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झाले होते इतके सस्पेंड

महिन्याच्या रिपोर्टनुसार मार्च महिन्यादरम्यान १,२३५ अकाऊंटला इंडियन सायबर स्पेसमध्ये दहशतवादी पसरवल्याप्रकरणी बंद करण्यात आले आहे. याआधी कंपनीने २६ जानेवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान भारतातील ५ लाख ६ हजार १७३ अकाऊंट बंद केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -