Monday, October 13, 2025

Narayan Rane : नकली, विकला जाणारा उद्धव ठाकरे, आयुष्यभर खंडणी मागितली!

Narayan Rane : नकली, विकला जाणारा उद्धव ठाकरे, आयुष्यभर खंडणी मागितली!

भेकड शब्दाचं उत्तर आता शब्दामध्ये देऊन उपयोग नाही, तसा आवाज काढावा लागेल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सणसणाटी टीका

सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप पक्षाचा (BJP Party) भाडखाऊ, भेकड असा उल्लेख केला. शिवाय भाजपच्या नेत्यांवर खंडणीखोर म्हणून टीकाही केली. त्यांच्या या टीकेला केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 'भेकड शब्दाचं उत्तर आता शब्दामध्ये देऊन उपयोग नाही, तसा आवाज काढावा लागेल' असा घणाघात नारायण राणे यांनी केला. तसेच 'उद्धव ठाकरे हा नकली, विकला जाणारा आहे, त्याने आयुष्यभर खंडणी मागण्याचं काम केलं', अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे याचं डोकं ठिकाणावर नाही, म्हणून देशाच्या नेत्यांवर खंडणीखोर म्हणून टीका करत आहे. कोण खंडणी घेत होता, कुठल्या रूममध्ये घेत होता याचा साक्षीदार मी आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आयुष्यभर खंडणी मागण्याचं काम केलं, बाकी यांचा काही उद्योगधंदा नाही. जे ४० आमदार सोडून गेले ते पोच करत होते, असा आरोप नारायण राणे यांनी केला.

एवढा घाणेरडा माणूस मी पाहिला नाही

उद्धव ठाकरे यांनी एक फोन करायचे तीन लाख रुपये घेतले, एवढा घाणेरडा माणूस मी पाहिला नाही. भाजपा म्हणजे भाडखाऊ, भेकड असं उद्धव ठाकरे म्हणाला. हे शब्द त्याने माझ्या पक्षाच्या नेत्यांसाठी वापरले याची मला प्रचंड चीड आहे. भेकड शब्दाचं उत्तर आता शब्दामध्ये देऊन उपयोग नाही, तसा आवाज काढावा लागेल, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली.

बाळासाहेबांनी विरोध केला, तिथे गुडघे टेकायला जातात

उद्धव ठाकरे यांना कुठलीही नोटीस आली की, मोदींच्या दारी सरेंडर व्हायचे. सुशांत सिंह आणि दिशा सालियान केसमध्ये किती तरी वेळा ते मोदींना भेटले ते विसरले. यांच्या डोक्यावर परिमाण झाला आहे नाहीतर ते असं बोलणार नाही. काहीही बोलतो, ते भोगावं लागेल, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला, तिथे उद्धव ठाकरे गुडघे टेकायला जातात, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.

Comments
Add Comment