कल्पनाच किती मोहक आहे की नाही?
प्रत्येकाला (म्हणजे ‘नर’ जनांना) पहिलीच्या वटवटीचा कंटाळा लवकरच येतो. काही महिन्यांतच असा बदल हवाहवासा वाटतो.
आपल्या बायकोपेक्षा शेजाऱ्याची बायको आवडणे हा प्रकार तर सर्रास आढळून येतो. उघड उघड बोलता येत नाही, पण ‘वहिनी’ हे संबोधन जनात अन् प्रिये, प्रियतमे, प्रियकरिणी अशी अत्यंत आवडती संबोधने मनात अगदी न चुकता, प्रत्येक विवाहित पुरुष ती वापरतो.
मंजिरी अशीच मनोजला आवडायची. आता शेजारी असलेल्या नराची, मित्रवर्याची पत्नी असल्याने ‘वहिनी’ हे संबोधन गरजेचे आणि संस्कारी जपणूक करणारे, ‘नॉन कमिटल’ संबोधन अर्थात होते.
“किती पुढे पुढे करता हो मंजिरी आली की?” बायको दमदाटी करी. पण तिला पक्की खात्री होती की सरडा ‘वहिनी’ पुढे ‘धावणार’ नाही. दुसरी बायको परवडते का या महागाईच्या दिवसांत? आपल्या हिच्या साड्या घेताना (म्हणजे खरेदी करताना) तोंडाला येतो फेस! म्हणजे दुसरीची ‘केस’ कुठे लढवा?
त्यापेक्षा “वहिनी, किती छान दिसता या साडीत!” अशी तोंड पाटिलकी पुरेशी होते, नाही का?
मनोजने अशी स्तुती शेजारणीची केली, असे बायकोला समजले, तेव्हा ती उखडली. रागे रागे म्हणाली, “दुसरी बायको करायचा विचार आहे वाटतं नौरोजींचा?”
“छे गं.”
“मग? शेजारणीच्या किती पुढे पुढे करता?”
“चुकलो गं क्षमा कर. आता बघ.”
“काय बघू?”
“तुझ्याच पुढे पुढे करतो या क्षणापासून.”
“दॅट इज गुड. शहाणा तो माझा नवरा!”
बायकोकडून प्रत्यक्षात दाद मिळल्यावर नवरे जसे फुशारतात तसा हा नौरोजीही फुशारला.
शेजारच्या नवऱ्याबरोबर ‘हा’ फिरायला गेला; तेव्हा त्याने मनाचा दरवाजा उघडला.
“खरं खरं सांगा हं शेजारीपतं. माझी बायको तुम्हाला आवडते ही गोष्ट खोटी की खरी?”
“खरं तर दुसरी… म्हणजे दुसऱ्याची बायको प्रत्येक पुरुषास हवीशी वाटते. मी अपवाद कसा असे ना?”
“ही आवडते?”
“खूप. खूपच आवडते.”
“अरे ती घोड्यासारखी खिंकाळते हसतांना!”
“मला तेच हिच्याबाबतीत असेच वाटते. घोडी वाटते घोडी!”
“दे टाळी तेरी मेरी जोडी जमी.”
“दुसरी बायको आवडी?”
“खूप म्हणजे खूपच आवडी. डबल, टिबल, चौबल, नऊबल आवडी.”
“चल पण आपण अदलाबदल करूया का?”
“कल्पना रम्य आहे. दुसरी बायको! मस्त मस्ताड आहे विचार.”
“बोलण्याची हिंमत आहे?”
“अजिबात नाही.”
“फिर? फुसका बार! नुसता हवा महल!”
“हवा महल तो हवा महल! सुख मिला की नाही?”
“भरपूर सुख. सुख ही सुख!”
“अरे बाजारात नवे दुकान आले आहे.”
“कपड्यांचे आहे का?”
“हो. नयी नयी साडियाँ. अच्छी अच्छी साडियाँ.”
“अरे वा! चल देखेंगे. बायको खूश होगी. नयी साडी देखकर.” दोघे मित्र फिरत फिरत दुकानी गेले.
नव्या साड्यांचा ढीग दुकानात पडलेला दिसला.
खुशी खुशी त्या साड्याच्या ढिगाकडे बघत राहिले! विस्मयचकित होऊन गेले.
इतक्यात ‘ओळखीचा’ स्वर कानी आला. अरे, तर हा चिरपरिचित आवाज सत्तत ऐकून कानात दडे बसलेला.
“काय करताय? बायकांच्या साड्यांच्या दुकानात?” आवाज चिरकला. नौरोजी गप्प गप्प, मख्ख मख्ख उभे. दुकानदार समजला. हसून म्हणाला, “दुसरी बायको” हे दुकानाचे नाव हे ‘आज’ सार्थ झाले.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…