Wednesday, July 24, 2024
HomeमनोरंजनSalman Khan: सलमान खानच्या घराच्या बाहेर गोळीबार, बाईकवरून आले होते हल्लेखोर

Salman Khan: सलमान खानच्या घराच्या बाहेर गोळीबार, बाईकवरून आले होते हल्लेखोर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या(salman khan) वांद्रेस्थित गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या(galaxy apartment) बाहेर गोळीबार करण्यात आले. हा हवेतील गोळीबार(firing) सकाळी साधारण ४.५० मिनिटांच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी केला. दोन्ही हल्लेखोर बाईकवरून आले होते आणि चार राऊंड फायरिंग केल्यानंतर ते तेथून पळून गेले. दरम्यान, या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पोलिसांनी सलमानच्या खानच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

या गोळीबारानंतर मुंबई क्राईम ब्रांचसोबत वांद्रे पोलीस टीम घटनास्थळी पोहोचली. सोबतच फॉरेन्सिक टीमही तपासासाठी पोहोचली. तर गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या बाहेरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अनेकदा सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकी दिल्या आहेत. नुकतेच लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता-सिंगर गिप्पी ग्रेवालच्या कॅनडास्थित घरी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर म्हटले होते की त्याचे सलमान खानसोबत जवळचे संबंध आहेत, याच कारणामुळे हल्ला करण्यात आला.

याआधीही मिळाली होती धमकी

२०२३मध्ये सलमानच्या ऑफिसमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगकडून एक धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा वाढवली होती. दरम्यान, सलमानला आता वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -