Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Ranbir kapoor : वयाच्या ११व्या वर्षी आलिया भट्ट पडली होती रणबीरच्या प्रेमात

Ranbir kapoor : वयाच्या ११व्या वर्षी आलिया भट्ट पडली होती रणबीरच्या प्रेमात

मुंबई: आज म्हणजेच १४ एप्रिलला आलिया(alia) आणि रणबीर(ranbir) यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. दोघांच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. जाणून घेऊया कशी होती दोघांची लव्ह स्टोरी...


रणबीर आणि आलिया हे बॉलिवूडमधील स्वीट कपल्सपैकी एक मानले जातात. मात्र फार कमी लोकांना त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल माहिती आहे. सिनेमात येण्याआधीच आलिया रणबीरच्या प्रेमात पडली होती.


हा किस्सा आहे २००५मध्ये आलेल्या ब्लॅक सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा. सिनेमाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. येथे आलिया रणबीरला पाहताक्षणीच प्रेमात पडली होती.


याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये केला होता. आलियाने सांगितले की ती त्यावेळेस केवळ ११ वर्षांची होती. दरम्यान, यानंतर दोघे कधी भेटले नाहीत. दरम्यान, शाहरूखचा एक डॉयलॉग आहे की जिस चीज को तुम दिल से चाहो, पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में जुट जाएगी.'


असेच काहीसे आलियासोबत घडले असावे. अनेक वर्षानंतर अयान मुखर्जीचा सिनेमा ब्रम्हास्त्र तिला ऑफर झाला. यात हिरो रणबीर कपूर होता. आता इतक्या वर्षानंतर खुद्द संधी चालून आली होती त्यामुळे त्याचा फायदा आलियानेही घेतला आणि आपल्या मनातली गोष्ट तिला सांगितली.


या सिनेमातूनच या दोघांच्या लव्हस्टोरीची सुरूवात झाली होती. शूटिंगदरम्यान दोघेही एकत्र दिसत होत. मग तो कोणता अवॉर्ड शो असो, कोणाचे लग्न असो सगळीकडेच रणबीर आणि आलिया एकत्र दिसत होते.


आलियाने करणच्या शोमध्य आपल्या लव्हस्टोरीबद्दल सांगताना म्हटले होते की ब्रम्हास्त्रच्या संपूर्ण टीमसोबत एक वर्कशॉप अटेंड करायला जायचे होते. तेव्हा मी रणबीरच्या बाजूला फ्लाईटमध्ये बसले होते. तेव्हा आमचे बोलणे सुरू झाले. त्यानंतर आमच्यात चांगली मैत्री झाली आणि ही मैत्री प्रेमात कधी रूपांतरित झाली हे आमचे आम्हालाच कळले नाही.


आलियाने हे ही सांगितले होते की रणबीरने आलियाला आफ्रिकन सफारीदरम्यान प्रपोज केले होते. याचा एक फोटोही तिने इन्स्टाग्रामवर टाकला होता. यावेळी रणबीरने गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केले होते.


रणबीर आणि आलियाने २०२२मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाच्या ७ महिन्यांनीच आलियाने राहाला जन्म दिला.

Comments
Add Comment