काव्यरंग

मोह सुमनांचा


सुमनांचा मोह मला
सांगू किती वेडावतो
गंधाळतो आसमंत
मला रोज खुणावतो


शुभ्र नाजुक पाकळ्या
जाई जुई सायलीच्या
अलगद उमलल्या
कुंदकळ्या चमेलीच्या


दरवळे श्वासातला
सोनचाफा सोनसळी
निशिगंध बहरता
गालावर खुले खळी


चिमुकल्या बकुळीला
गंध मोहक स्मृतींचा
मुग्ध केशरी आबोली
हसे मोगरा कळीचा


लाल जास्वंद लाजता
शुभ्र टगर डोलते
प्रेमवेडी रातराणी
जरा लपून बघते


गेले रंगून रंगात
सुमनांनी मोहविले
काय झाले उमजेना
गाली गुलाब फुलले..!!


- मनीषा शेखर ताम्हणे, बोरिवली



वेस


हृदयात सहस्त्रवार झेलत, उभी असते बाई,
तिची पार्श्वभूमी, तिचा प्रवास...
जगण्यासाठीचा संघर्ष,
माहीत असतो तिला
पण कधीतरी, केव्हातरी हिंदोळ्यावर जागरणं होत आठवणींचं..
तेव्हा
मळभं भरलेले आषाढ ढग झिरपू
लागतात तिच्या अंतर्मनात.
उचकटतात दोर शिवलेल्या मेंदूचे
अंगार फुलतो वेदनेचा
शिव्या शापांची पुण्याई घेऊन,
ती निघते...
डंका फुटतो तिच्या नावाचा, गावाच्या वेशीवर...
तेव्हा पछाडलेल्या इंद्रियांची गुंतागुंत अधिक घट्ट होते.


डोळ्याचा पदर भिजतो, पण थांबत नाही कोलाहल
आर्तता शोषतात वखवखलेल्या नजरा
ताशेरे ओढतात बेताल माणसं
बाई ढासळते... आणि आसवांची वाट मोकळी होते...
बांध फुटतो काठावरचा
गंगा जमुना मोकळ्या होतात पवित्र्य
अपावित्र्याच्या जंजाळातून.
स्वतंत्रपणाचं कळकट मळकट स्वरूप घेऊन... बाई वेस ओलांडते...
परिणामांची चिंता न करता
बाई वेस ओलांडते...
परिणामांची चिंता न करता...


- पूजा अ. काळे, मुंबई


Comments
Add Comment

...म्हणून समाज मोदींना मानतो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते देशाचे पंतप्रधान इतका मोठा आणि अविश्वसनीय प्रवास करणारे नरेंद्र मोदी

मराठी पत्रकारितेचे जनक - बाळशास्त्री जांभेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर आचार्य अत्रे यांनी कै. बाळशास्त्री जांभेकर यांना ‘राष्ट्रजागृतीचे अग्रदूत’ असे म्हटले

छडी वाजे छमछम

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू मुलं लहान असतानाच शिस्त लावण्याची सुरुवात करायला हवी. पण मुलं लहान असताना

“...हम भी देखेंगे!”

बरोबर १०३ वर्षांपूर्वींची इम्तियाज अली ताज यांची एक कादंबरी सिनेदिग्दर्शक के. आसिफ यांना इतकी आवडली की त्यांनी

घेता घेता...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर आमच्या शाळेच्या क्रमिक पुस्तकात आम्हाला विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता

कथा सोमकांत राजाची

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे सर्व देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान असणाऱ्या गणेशाच्या विविध वैशिष्ट्याचे