भाजपा जाहीरनाम्याचे नाव ‘मोदी की गारंटी’
पंतप्रधान मोदी यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
युवा, नारीशक्ती , गरीब शेतकऱ्यांवर आधारित जाहीरनामा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २५ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर १५ लाखांहून अधिक सूचना आल्या होत्या. आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपाचा संकल्प पत्र (BJP Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहीरनाम्याचे नाव ‘मोदी की गारंटी’ असे नाव देण्यात आले आहे. युवा, नारीशक्ती , गरीब शेतकऱ्यांवर आधारित हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी लोकसभा निवडणूक २०२४ (Loksabha Election 2024) साठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध (BJP Manifesto) करण्यात आला. हे जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. भाजपाकडून या जाहीरनाम्याला संकल्प पत्र असे संबोधित करण्यात आले असून या जाहीरनाम्याची पहिली प्रत सरकारी योजनेच्या एका लाभार्थ्याला देण्यात आली आहे.
“आज अतिशय शुभ दिवस आहे. आज काही राज्यात नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. संपूर्ण भारताला भाजपाच्या संकल्प पत्राची प्रतिक्षा होती. भाजपाने दिलेले सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. देशातील जनतेला भाजपावर विश्वास आहे. हा जाहीरनाम्यामध्ये युवा, शेतकरी, नारी शक्ती, गरीबांवर आधारीत आहे. भारतीयांचे जीवनमान उंचवण्याकडे आमचा फोकस आहे. गरीबांच्या जेवणाची धाळी पोषणयुक्त असावी, असा आमचा संकल्प आहे. मोफत राशनची योजना पुढील पाच वर्ष सुरु राहणार आहे. ७० वर्षावरील वद्धांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे, गरीबांसाठी ३ कोटी घरे बांधण्याचा संकल्प आमचा आहे. आता घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे”,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा जाहीरनामा प्रसिद्ध करताना म्हटले.
Bharatiya Janata Party (BJP) released its election manifesto – ‘Sankalp Patra’ for the ensuing Lok Sabha polls in the presence of Prime Minister Narendra Modi, Home Minister Amit Shah, Defence Minister Rajnath Singh, Union Finance Minister Nirmala Sitharaman and party President… pic.twitter.com/86aXnR9Juo
— ANI (@ANI) April 14, 2024