
मुंबई: पुदिन्याचे पाणी दररोज प्यायले पाहिजे. यात फोलेट, कॅल्शियम, कॅरोटीनस, मॅग्नेशिअम, पोटॅशियम आणि व्हिटामिन सी असते. यामुळे शरीर आणि पोट दोन्ही थंड राहते. तसेच उष्णतेच्या लाटांचा त्रासही होत नाही.
उन्हाळ्यात दररोज एक ग्लास पुदिन्याचे पाणी प्यायलायस आपली त्वचा उजळते. सोबतच शरीराला एनर्जीही मिळते.
पुदिन्याचे पाणी प्यायल्याने थकवा दूर होण्यासही मदत होते. चेहऱ्यावर चमक येते. तसेच स्किन ग्लो होते.
पुदिन्याचे पाणी प्यायल्याने पचनव्यवस्था सुधारते. सोबतच अॅसिडिटी, पोटात जळजळ, छातीत जळजळ आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.
पुदिन्याच्या पाणीमध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल हे गुण असतात. हे पाणी दररोज प्यायल्याने फायदा होतो. याची प्रकृती थंड असते.
पुदिन्याचे पाणी दररोज प्यायल्याने मेटाबॉलिज्म सुधारते. सोबतच केस, स्किन आणि पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.