Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुणे वाहतुकीत मोठे बदल

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुणे वाहतुकीत मोठे बदल

जाणून घ्या काय आहेत पर्यायी मार्ग


पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुणे स्टेशन, अरोरा टॉवर कॅम्प, विश्रांतवाडी आणि दांडेकर पूल परिसरात दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने मिरवणूक मार्गावरील वाहतूक आज (१५ एप्रिल) पहाटे २ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक शाहीर अमर शेख चौकातून वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग : शाहीर अमर चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने आरटीओ चौक जहांगीर चौकमार्गे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील.


जीपीओ चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक जीपीओ चौकातून वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग : जीपीओ चौक ते मालधक्का चौक ही वाहतूक किराड चौक नेहरू मेमोरियल चौकमार्गे गंतव्यस्थानी जाण्यासाठी जाणार आहे.


पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक पुणे स्टेशन चौकातून वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग : पुणे स्थानकातून वाहने अलंकार चौकमार्गे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील.


नरपतगीर चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगीर चौकातून वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग : नरपतगीर चौक ते १५ ऑगस्ट चौक ते कमला नेहरू रुग्णालय ते पवळे चौक ते कुंभारवे चौक या मार्गाने इच्छित स्थळी जावे लागेल.


बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक बॅनर्जी चौकातून वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग : बॅनर्जी चौक ते पॉवर हाऊस चौक, नरपतगीर चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरू रुग्णालय, पवळे चौक, कुंभारवे चौक.


वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था :
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी : एस.एस.पी.एम.एस. मैदान (दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी), तुकाराम शिंदे पार्किंग (दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी) आणि ससून कॉलनी येथे (दुचाकी वाहनांसाठी) पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.


अरोरा टॉवर चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी आपली वाहने तारापोर रोड, ईस्ट स्ट्रीट व आजूबाजूच्या रस्त्यांवरील पे अँड पार्क येथे पार्क करावीत.


स्वारगेट ते सिंहगड रस्त्यावरील वाहतूक :
सावरकर चौक ते थोरले बाजीराव पेशवे पथ ते कल्पना हॉटेल चौक ते क्र.सी.फडके ते मांगीरबाबा चौक ते सेनादत पोलीस चौकी चौक ते बाळ शिवाजी ते आशा हॉटेल चौक ते सिंहगड रोड.


सिंहगड रोड ते स्वारगेट वाहतूक :
आशा हॉटेल चौक ते डावीकडे बाळ शिवाजी ते सेना दत्त पोलिस चौकी चौक ते मांगीरबाबा चौक ते एन. सी. फडके चौक ते कल्पना हॉटेल चौक ते सणस पुतळा चौक या ठिकाणी सोयीनुसार वळावे.


शास्त्री रोडवरून येणारी वाहतूक :
सेनादत्त चौकातील वाहने मांगीरबाबा चौकातून डावीकडे वळावीत आणि चौकाकडे वळावीत.

Comments
Add Comment