Thursday, October 3, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलहोऊ निसर्गाचे उतराई...

होऊ निसर्गाचे उतराई…

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. चैत्राच्या सोनेरी पहाटेच नव्या दिवसाला नव्या दिशांची विश्वासाने खरी सुरुवात होते. प्रारंभ नवसंवत्सराचे होणारे आगमन.

प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षांच्या वनवास संपवून सीतेसह अयोध्येत आले. तो हाच शुभ दिन सोहळ्याचा साडेतीन मुहूर्तापैकी एक. नव्या वर्षाकडे आनंदाचे उधान नवलाईचा आनंदाचा आणि नैसर्गिक आनंदी क्षण चैतन्य रुपी, प्रेरणादायी, ऊर्जादायी आनंदोत्सव. निसर्ग भरभरून देतो यांचं महत्त्व ओळखून हा जल्लोष साजरा केला जातो. घरोघरी जागोजागी गुढ्या उभारल्या जातात. त्या गुढीला चांदीचा तांब्या आंब्याच्या पानांचे तोरण पिवळी धम्म झेंडूची फुलं, चाफ्याची माळ, सुंदर भरजरी वस्त्र आणि एक काठी आणि त्याला साखरेच्या माळी लावून जागोजागी गुढ्या तोरणे सजवून मंगलमय वातावरणामध्ये स्वागतयात्रा देखील काढल्या जातात. आपल्या हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्व नटून-थटून सामील होतात.

आपल्या प्रथा परंपरा संस्कृतीनुसार सण उत्सव साजरे करण्यासाठी चैत्र मासात येणारा वसंत ऋतूचे आगमन म्हणजे नैसर्गिक होणाऱ्या बदलांमध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते. सृष्टी सजली जाते निसर्गाचे चैत्र मासात साजरे होणारे रुप बदलून जाते. म्हणूनच याला मधुमास देखील म्हटलं जातं. उष्णतेचा प्रकोप किती असला तरी हा उन्हाळा अनुभवण्यासाठी तो सण साजरा करण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून या दिवशी सर्व शुभकार्याचे मंगलमय आखणी केली जाते. वर्षाच्या सुरुवातीचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडव्याला आपण सृष्टी बदलाच्या प्रत्येक निसर्गातील शक्तीचा अनुभव घेत असतो. दर्शन घेत असतो. आंब्याचा हंगाम असतो त्यामुळे आपण आमरस करतो. आंब्याची पानं, झेंडूची पान, झेंडूची फुलं पूजेमध्ये ठेवतो. फुलांचे तोरण लावून उंच गुढी प्रत्येकाच्या घरोघरी उभारली जाते. रांगोळ्या काढल्या जातात. याचप्रमाणे मधुमास कधी होऊन जातो समजतच नाही आणि म्हणून मानवी मनातल्या भावभावनांना सुखदुःखाला निसर्ग नेहमी साथ देत असतो.

हे सण साजरे करण्यासाठी नेसूनी साडी माळून गजरा उभी राहिली गुढी नववर्षाच्या स्वागताची ही पारंपारिक रूढी. गुढी उभारणे म्हणजे शुभकार्य नव्या वर्षाचे स्वागत करणे. नव्या नव्या स्वप्नांना आकांक्षांना आणि मनोकामनांना सिद्ध करण्यासाठी आपल्या स्वतःलाच आपण आतून एक प्रेरणा आणि ऊर्जा देत असतो. जसं आंब्याचा मोहोर असतो तसाच गुलमोहरही या चैत्रातच बहरतो आणि सुंदर दिसतो. सुंदर सुंदर निसर्गातील निसर्गरम्य हिरव्या वनराईचे बहारदार नयनरम्य बदल पाहून अखंड सृष्टी वसंत ऋतूत बदलून नवी उमेद निर्माण करते. अद्भुत नयनरम्य असे वातावरण निर्मिती करते. या निसर्गावरच आपण अवलंबून असणारे एक अविभाज्य घटक आहोत.

आपल्या निसर्गाच्या जादुई कलाकृतीमुळे आपल्याला निसर्ग खूप काही शिकवून जातो. समता, बंधुता आणि मानवतेच्या या गुढी गुढीपाडव्यानिमित्त आपण एकमेकांना मनापासून शुभ वर्षासाठी शुभकामना देतो रोमारोमात चैतन्यमय सृजनता, सर्जनता, नाविन्य सौहार्द निर्माण करणाऱ्या या निसर्गरम्य, उत्साही, आनंददायी, प्रसन्न प्रेरक, मोहक पारंपरिक सणांमध्ये सुद्धा एक ऊर्जा असते आणि ती आपण टिकून ठेवण्यासाठी निसर्गाचा आधार घेऊन त्या निसर्गाचा आधार बनुया आणि निसर्गही वाचवूया. आंब्याप्रमाणे गोड, मधुर आणि फुलाप्रमाणे सुगंधी आपलेही नववर्ष व्हावे असा संदेश नववर्षाच्या शुभारंभ प्रसंगी एकमेकांना द्यायला हवा. चला तर मग यावर्षी एक तरी झाड लावूया आणि निसर्ग जपण्याची गुढी उभारु या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -