Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाIPL 2024IPL 2024: फिल सॉल्ट, श्रेयस अय्यरचे वादळ, केकेआरला जिंकवून दिला चौथा सामना

IPL 2024: फिल सॉल्ट, श्रेयस अय्यरचे वादळ, केकेआरला जिंकवून दिला चौथा सामना

मुंबई: आयपीएल २०२४मधील २८वा सामना आज १४ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात केकेआरने शानदार ८ विकेटननी विजय मिळवला. केकेआरने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला.

केकेआरसाठी फिल सॉल्टने शानदार अर्धशतकी खेळी केली. हा कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएलमधील चौथा विजय आहे. पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या लखनऊला तशी काही विशेष कामगिरी करता आली नाही. लखनऊला २० षटकांत केवळ १६२ धावा करता आल्या.

१६३ धावांचे आव्हान घेऊन केकेआरचा संघ मैदानात उतरला. केकेआरसाठी सलामीची भूमिका निभावणाऱ्या फिल सॉल्टने वादळी खेळी केली. त्याने ४७ बॉलमध्ये ८९ धावा ठोकल्या. श्रेयस अय्यरनेही त्याला चांगली साथ दिली. अय्यरने ३८ बॉलमध्ये ३८ धावा केल्या.

लखनऊसाठी केवळ मोहसिन खाननने २ विकेट मिळवल्या. याशिवाय कोणत्याही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. या विजयासह केकेआरच्या संघाचे ८ गुण झाले आहेत. ते पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. केकेआरच्या वर राजस्थान रॉयल्स आहेत ज्यांचे १० पॉईंट्स आहेत. केकेआरचा पुढील सामना राजस्थानविरुद्ध आहे. १६ एप्रिलला दोन्ही संघ आमनेसामने असतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -