Friday, July 11, 2025

Health: वर्कआऊटदरम्यान, अधिक पाणी पिणे ठरू शकते धोकादायक

Health: वर्कआऊटदरम्यान, अधिक पाणी पिणे ठरू शकते धोकादायक

मुंबई: वर्कआऊट करताना पाणी पिणे गरजेचे आहे मात्र तुम्हाला माहीत आहे की अधिक पाणी पिण्यामुळेही समस्या निर्माण होऊ शकतात. हा, खरंतर जर तुम्ही वर्कआऊटदरम्यान खूप पाणी पित असाल तर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जाणून घेऊया अधिक पाणी तोटे...


वर्कआऊटदरम्यान आपण जर गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायलो तर आपल्या रक्तात सोडियमचा स्तर कमी होऊ शकतो. याला हायपोनॅट्रेमिया म्हणतात जो खूप धोकादायक असतो. सोडियम आपल्या शरीरासाठी गरजेचे आङे. कारण हे पेशी आणि मसल्सला काम करण्यास मदत करतात.


अधिक पाणी प्यायल्याने तुम्हाला डोकेदुखी, थकवा, कसेतरी होणे या समस्या सतावू शकतात. अशातच लगेचच पाणी पिणे बंद करावे आणि डॉक्टरांशी संपर्क साधावा.



योग्य प्रमाणात पाणी प्या


प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची पाण्याची गरज वेगवेगळी असते. वर्कआऊठदरम्यान दर २० मिनिटांनी साधारण २४० मिलीलीटर पाणी प्यायले पाहिजे. मात्र हे प्रमाण तुमच्या शारिरीक हालचाली, हवामान आणि येणारा घाम यावर अवलंबून आहे. वर्कआऊटआधी आणि नंतर पाणी पिण्यासोबतच इलेक्ट्रोलाईट्स असलेल्या ड्रिंक्सचे भरपूर सेवन केले पाहिजे.


व्यायामाच्या आधी जर तुम्ही चांगल्या प्रमाणात पाणी पित असाल तर यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच व्यायाम करताना दर २० मिनिटांनी पाणी प्यायले पाहिजे यामुळे थकवा जाणवणार नाही. तसेच शरीर योग्य पद्धतीने काम करू शकेल.

Comments
Add Comment