Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti: ''थॅंक यू बाबासाहेब! तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही.”

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti: ''थॅंक यू बाबासाहेब! तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही.”

जयंतीनिमित्त गौरव मोरेने शेअर केला 'हा' खास फोटो


मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आज (१४ एप्रिल) राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. अनेक मराठी कलाकारांनी यानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. त्यातीलच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेनेही डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


लंडनमध्ये जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास होते. तिथे ते अभ्यास करण्यासाठी ज्या खुर्ची आणि टेबलचा वापर करायचे, त्या वस्तू आजतागायत आहेत. अभिनेता गौरव मोरेने त्या वास्तूंना भेट दिली होती. याचा फोटो शेअर करत गौरव मोरेने पोस्ट लिहली आहे. “हीच ती खुर्ची आणि टेबल ज्याच्यावर बसून बाबासाहेबांनी लंडनमध्ये अभ्यास केला होता. त्या पवित्र वास्तूला मी २०२२ साली भेट दिली होती. आज १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. थॅंक यू बाबासाहेब! तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही” असे गौरव मोरेने म्हटले आहे.


गौरवने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही काही फोटो दिसत आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी प्रतिक्रिया देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नमन केलं आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)




Comments
Add Comment