नीलम गोऱ्हे यांची उद्धव ठाकरेंवर सणसणीत टीका
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत, हे लवकरच कळेल. हे चार जूनला सिद्ध होणार आहे, अशी सणसणीक टीका नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. ‘संजय राऊत (Sanjay Raut) प्रचंड ज्ञानी आहेत, मी त्यापुढे सामान्य कार्यकर्ती आहे. त्यामुळे कुठलं उत्तर न देणे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं आहे’, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांनाही टोला लगावला आहे.
नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं की, उद्धव ठाकरेंच्या मनात प्रचंड द्वेष आहे. त्या संतापाच्या भरात ते बोलत असतात. जामिनावरील लोकांचं काय मत आहे. हे चार जूनला सिद्ध होणार आहे. कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत, हे लवकरच कळेल. राजकीय दृष्ट्या जनाधार संपला, एवढं मात्र उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
नीलम गोऱ्हे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं आहे की, प्रत्येक पक्ष हे काम करतच असतात. राहुल गांधींनी त्यांनी केलेलं वचन, जाहीरनामे आणि निवेदन आणि मनमोहन सिंहाच्या काळातील निर्णयाचे कागद फाडून टाकले होते. तसे स्वतःच्या खासदारांचे निर्णय ते फाडून टाकणार नाही याचे उत्तर पहिले त्यांनी द्यावे. रश्मी बर्वे प्रकरणांमध्ये जे काही निर्णय घेतलेले आहे, त्याबद्दलची सहानुभूती मिळून उलट महिला मतदारांची लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी आहे.