
अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल
मुंबई : मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (Bandra-Kurla Complex) भीषण आगीची घटना (Fire news) घडली आहे. बीकेसी (BKC) परिसरात असलेल्या सरकारी कार्यालयातील (Government office) निवृत्ती वेतन विभागाच्या कार्यालयाला चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर ही लाग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कार्यालयातील अग्निशमन यंत्रणा कार्यन्वयीत केल्यानंतर देखील आग विझत नसल्याने अग्निशमन विभागाला कळवण्यात आलं. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Mumbai Fire: बीकेसीत इमारतीला भीषण आग#Mumbai #MumbaiFire #MumbaiNews pic.twitter.com/g4MwSmggWl
— Times Now Batmya (@timesnowbatmya) April 13, 2024