Tuesday, July 1, 2025

Narayan Rane : उद्वव ठाकरेंसारखा माणूस मुख्यमंत्री म्हणुन महाराष्ट्राला लागलेला कलंक

Narayan Rane : उद्वव ठाकरेंसारखा माणूस मुख्यमंत्री म्हणुन महाराष्ट्राला लागलेला कलंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हल्लाबोल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅट्रिक होणार


भाजपा महायुतीच्या चारशे खासदारांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार असणारच


मालवण : देशासाठी दिवस रात्र काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव जागतिक स्तरावर होत आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक अमेरिका व अन्य विकसित राष्ट्रानी केले आहे. विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाचा सन्मान सर्व स्तरावर होत असताना चारशेपेक्षा जास्त खासदार विजयी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅट्रिक पुर्ण होणार. यासोबत रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार भाजप महायुतीच्या चारशे खासदारांमधील एक असणार, असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केला.


दरम्यान, उद्धव ठाकरेंकडून (Uddav Thackeray) भाजपवर होत असलेल्या टीकेला कृतीतून उत्तर देणार. उद्धव ठाकरेंसारखा माणूस मुख्यमंत्री म्हणुन महाराष्ट्राला लागलेला कलंक होता, असा जोरदार हल्लाबोल नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या कंपनीत सगळेच चिटर असल्याचाही टोला त्यांनी यावेळी लगावला.


आडवली मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत राठीवडे येथे संपन्न झाला. यावेळी भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >