Monday, July 22, 2024
Homeदेशदेशात तापमानाचा पारा वाढणार! पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक

देशात तापमानाचा पारा वाढणार! पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक

नवी दिल्ली: भारताच्या हवामान विभागाकडून एप्रिल आणि जून दरम्यान सामन्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटा असणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी हीटव्हेव सीजनच्या तयारीची समीक्षा करण्यासाठी एक बैठक घेतली. पंतप्रधान कार्यालयानुसार या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी एप्रिल ते जून दरम्यान तापमानाच्या पूर्वानुमानासंबंधी माहिती देण्यात आली.

या चर्चेमध्ये आरोग्य क्षेत्रातील तयारींबाबतही आढावा घेण्यात आला. यामध्ये उष्णतेच्या लाटांचा परिणाम कमी होण्यासाठी आवश्यक औषधे, ड्रिप आणि पेयजल यांचा पुरेसा पुरवठा हे मुद्दे सामाविष्ट होते.

पीएमओने आपल्या विधानात म्हटले की पंतप्रधान मोदींनी एकजूट, तसेच समग्र सरकारच्या नजरेने पाहण्याची गरज आहे. यात केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील प्रशासन आणि विविध मंत्रालयांनी योग्य तो समन्वय साधावा असा आग्रहही यावेळी पंतप्रधानांनी केला.

या बैठकीत पंतप्रधानांचे मुख्य सचिव, गृह सचिव, भारत हवामान विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख अधिकारी सामील होते.

एकीकडे भारतात आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. यात हजारो लोक राजकीय रॅली तसेच मतदान केंद्रांवर रांगेमध्ये दिसणार आहेत. सात टप्प्यात होणारी ही निवडणूक १९ एप्रिलपासून सुरू होत आहे. १ जूनला मतदान संपणार आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये उष्णतेच्या लाटा अधिक असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुजरात, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -