Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

Megablock : तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Megablock : तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे होणार हाल

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार १४ एप्रिल रोजी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात आला आहे. यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वेने ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी/सेमी जलद सेवा मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या/सेमी जलद सेवा कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, पुढे अप धीमी सेवा डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील व पुन्हा मुलुंड येथे वेळापत्रकाच्या १० मिनिटे उशिराने पोहोचेल.

हार्बर मार्गावर कुर्ला व वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर वर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. पनवेल / बेलापूर / वाशीसाठी सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला व पनवेल - वाशी या दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी रविवार, १४ एप्रिल रोजी बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावरील गाड्या बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर चालवल्या जाणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील काही बोरिवली आणि अंधेरी गाड्या गोरेगावपर्यंत चालवल्या जातील.

Comments
Add Comment