Friday, September 12, 2025

Kangana Ranaut: ...तर मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन!

Kangana Ranaut: ...तर मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन!

मनालीमधून कंगना रणौतची काँग्रेसवर बोचरी टीका

राहुल गांधींना दिलं खुलं आव्हान

शिमला : अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशच्या मंडीतील भाजपा उमेदवारीचे तिकीट दिले आहे. त्यामुळे कंगना रणौत चांगलीच चर्चेत आली आहे. कंगनाला तिकीट मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. मात्र त्यावरुन मोठा गहजब झाल्यानंतर त्यांनी ती डिलिट केली. आता कंगनाने हिमाचलमधल्या मनालीमध्ये घेतलेल्या प्रचार सभेत राहुल गांधींना पप्पू म्हणत आव्हान दिलं आहे.

“काँग्रेसचा विचार हा महिलांविरोधी आहे. नवरात्र उत्सव सुरु असतानाही त्यांचा महिला विरोधी विचार समोर येतो आहे. मला जेव्हापासून तिकिट मिळालं आहे या काँग्रेसच्या लोकांना मिरची लागली आहे. माझा अपमान केला जातो आहे, मला कलंकित केलं जातं आहे. असे कंगनाने प्रचार सभेत सांगितले. तसेच पुढे एक मोठा पप्पू दिल्लीत बसला आहे, आपल्याकडे एक छोटा पप्पू आहे. तो म्हणे मी गोमांस खाते, त्याच्याकडे व्हिडीओ आहे. त्याने व्हिडीओ दाखवावा, त्याच्याकडे पुरावा असेल तर त्याने तो सादर करावा. पण ते तो करणार नाही कारण तो छोटा पप्पू खोटारडा आहे, असेही कंगनाने म्हटले. दिल्लीतील मोठा प्पपू म्हणजेच राहुल गांधी यांना शक्तिचा विनाश करायचा आहे असे म्हणतात. त्यामुळे या काँग्रेसच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार? ” असा प्रश्न कंगनाने विचारला आहे.

मला अपवित्र, कलंकित का ठरवलं जातं ?

“माझ्यावर टीका केली जाते की मी अपवित्र आहे. मी देवभूमीत जायला पाहिजे. मला का अपवित्र, कलंकित ठरवलं जातं आहे. माझा महिला भगिनींना सवाल आहे या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांनी आपलं स्थान निर्माण करायचं नाही का? केंद्रात किती महिला मंत्री आहेत? राज्यांमध्ये किती महिला मंत्री आहेत? आपल्या मुलींचं भविष्य आहे का? तुमच्या मनालीची मुलगी म्हणजे मी स्वतःचं अस्तित्व शोधते आहे तर यांना मिरची का लागते? एकीकडे या प्रकारची घाणेरडी विचारधारा असलेले पुरुष आहेत. दुसरीकडे आपल्या सगळ्यांचे लाडके नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी महिलांनी राजकारणात यावं म्हणून ३३ टक्के आरक्षण दिलं आहे.” असं कंगनाने म्हटले.

आपण कलेला निवडत नसतो, कला आपल्याला निवडत असते

कंगना रणौतने धमक्या देणाऱ्या व घाबरवणाऱ्या सगळ्या लोकांना खुलं आव्हान केलं आहे. राजकारण ही तुमची वडिलोपार्जित संपत्ती नाही. हा नरेंद्र मोदींचा नवा भारत आहे. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे मी येते व ढिंकचॅक करते. मी त्याला (राहुल गांधी) इथे बोलवू इच्छिते, त्याने माझ्या चित्रपटातला एक सीन मला करुन दाखवावा. तो सीन जर त्याने करुन दाखवला की मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन. असे आव्हान कंगनाने राहुल गांधींना केले आहे. आपण कलेला निवडत नसतो, कला आपल्याला निवडत असते हे बोलणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. कंगनाला राजकारण येतं का? असं विचारणाऱ्या सगळ्यांना ४ जूननंतर आपोआप उत्तर मिळेल, असंही कंगनाने म्हटले.

Comments
Add Comment