Monday, July 15, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : छत्रपतींच्या गादीबद्दल आदर असेल तर संजय मंडलिकांचा नियम संजय...

Nitesh Rane : छत्रपतींच्या गादीबद्दल आदर असेल तर संजय मंडलिकांचा नियम संजय राऊतला का नाही?

आमदार नितेश राणे यांचा मविआच्या कोल्हापूरच्या नेत्यांना परखड सवाल

छत्रपतींच्या वंशजाचे पुरावे मागून त्यांचा सर्वात मोठा अपमान करणारा संजय राऊतच : नितेश राणे

मुंबई : ‘संजय मंडलिकांच्या (Sanjay Mandalik) वक्तव्यांमुळे छत्रपती शाहू महाराजांच्या (Chhatrapati Shahu Maharaj) गादीचा अपमान कसा झाला, याबाबत आज सकाळी संजय राऊत (Sanjay Raut) मुक्ताफळे उधळत होता. याच संजय राऊतने छत्रपतींच्या गादीचे पुरावे मागितले होते. म्हणजे सर्वात मोठा अपमान संजय राऊतनेच केला होता. त्यानंतरही हा छत्रपतींना जाऊन भेटतो, त्यांना भगवी शाल घालतो, मग मविआचे कोल्हापूरचे जे नेते आहेत जे आज संजय मंडलिकांना माफी मागायला सांगतायत, तेव्हा त्यांनी या संजय राऊतला माफी मागायला का सांगितली नाही?’, असा खडा सवाल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मविआच्या कोल्हापूरच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.

नितेश राणे म्हणाले, ज्या संजय राऊतने छत्रपतींच्या वंशजाचे पुरावे मागितले, त्याला आम्ही कोल्हापूमध्ये पाऊल ठेवू देणार नाही, त्याला महाराजांच्या घरात जाऊ देणार नाही, अशी भूमिका तेव्हा मविआच्या नेत्यांनी का घेतली नाही? खरंच जर तुम्ही छत्रपतींच्या गादीचा आदर करत असाल तर जो नियम तुम्ही संजय मंडलिकांना लावला तो संजय राऊतांना का लावला नाही?, असा परखड सवाल नितेश राणे यांनी विचारला.

आजची मातोश्री, उबाठा आणि हिंदुत्वाचा काही संबंध आहे का?

पुढे नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत म्हणतो की अमित शाह मातोश्रीवर यायचे तेव्हा हेच उद्धव ठाकरे होते. पण या बावळटाला माहित नाही की अमित शाह, देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाचा कोणताही प्रमुख नेता हा आदरणीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी असलेल्या आदरापोटी मातोश्रीपर्यंत यायचे. बाळासाहेबांची शिवसेना ही हिंदुत्वावर आधारलेली होती, त्यामुळे आमच्या नेत्यांना तिथे पाऊल ठेवायला कोणतीही हरकत नव्हती. पण आजची मातोश्री आणि उबाठा नावाचा उद्धव ठाकरेचा गट याचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध आहे का? ज्या काँग्रेस आणि शरद पवार साहेबांच्या गटाने वर्षानुवर्षे हिंदुत्वाचा द्वेष केला, ज्या काँग्रेसने रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला त्या काँग्रेसचे पाय चाटण्याचा प्रकार उबाठा करत आहे. म्हणजेच शिवसेना आणि उबाठामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे, म्हणून आता मातोश्रीवर कोणी फिरकत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

राहुल गांधी एकदाही मातोश्रीमध्ये का आले नाही?

अमित शहांवर बोट उचलणार्‍या संजय राऊतांना यानिमित्ताने विचारेन की, तुमची तीन ते चार वर्षांपासून काँग्रेससोबत आघाडी आहे. आमचे अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, विनोद तावडे, राजनाथ सिंह असतील हे वर्षानुवर्षे मातोश्रीवर आले, पण तुमचा राहुल गांधी एकदाही उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी त्या मातोश्रीमध्ये का आला नाही? हा प्रश्न राहुल गांधी आणि काँग्रेसवाल्यांना विचारायची एकदा तरी हिंमत करा, असं नितेश राणे म्हणाले.

तुझ्या मालकाने महापौर बंगला हडपला

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, आदरणीय मोदीसाहेबांना ना संसद ताब्यात घ्यायची आहे, ना इथे हुकूमशाही गाजवायची आहे. आपला देश आजही जगातल्या लोकशाही देशांमध्ये अग्रक्रमांकावर आहे आणि ते फक्त नरेंद्र मोदींमुळेच आहे. जसं तुझ्या मालकाने महापौर बंगला हडपला आणि तेव्हाच्या महापौर किशोरी पेडणेकरांना राणीच्या बागेत प्राण्यांमध्ये राहायला नेऊन सोडलं, तसं मोदीजी कधीच करणार नाहीत, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -