मुंबई: अनेकांना याबाबतीत शंका असते की फळ खाण्याची योग्य वेळ काय आहे? फळे कधी खाल्ली पाहिजेत जेवणाआधी की जेवणानंतर? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आज जाणून घेऊया की जेवणानंतर फळे खाल्ली पाहिजेत की नाही…
फळे आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर असतात. यात मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि व्हिटामिनसोबत कॅलरीजही असतात. मात्र अनेकजण कन्फ्युज असतात की फळे खाण्याची योग्य वेळ काय आहे…
आरोग्य तज्ञांच्या मते फळे जेवणाच्या अर्धा ते एक तास आधी खाल्ली पाहिजेत. यामुळे शरीरास पोषण मिळते. जर तुम्ही फळे जेवणानंतर खात असाल तर शरीरात फळांमधील एक्स्ट्रा कॅलरीज जातात. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचते.
त्यामुळे फळे जेवणासोबत अथवा जेवणानंतर लगेचच खाऊ नये. फळे खाण्याची योग्य वेळे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असते. रात्री झोपण्याआधी फळांचे सेवन करू नये.
आरोग्य तज्ञ सांगतात की जेवणानंतर लगेचच फळे अजिबात खाऊ नयेत. खरंतर, जेवणाआधी शरीराला कॅलरीजची गरज असते जी जेवणादरम्यान पूर्ण होते. त्यामुळे त्यानंतर फळे खाल्ल्यास शरीरास अधिकची कॅलरी घ्यावी लागते. यामुळे पाचनशक्तीवर परिणाम होतो. यामुळे पोटाशी संबंधित आजार अपचन, अॅसिडिटीचा त्रास होतो.