Saturday, November 15, 2025

१०४० कोटी रूपयांवर पोहोचली धोनीची नेटवर्थ, शेतीशिवाय आहेत अनेक बिझनेस

१०४० कोटी रूपयांवर पोहोचली धोनीची नेटवर्थ, शेतीशिवाय आहेत अनेक बिझनेस

मुंबई: महेंद्रसिंग धोनी(ms dhoni)  देशातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. आता त्याची नेटवर्थ १०४० कोटी रूपये आहे. माज्ञ जर तुम्ही विचार करत असाल की इतका सारा पैसा त्याने खेळातून कमावला आहे तर असे अजिबात नाही. धोनी केवळ खेळातूनच नव्हे तर इतर बिझनेसमधूनही पैसे कमावतो.

धोनीच्या शेतीच्या बिझनेसबद्दल तर सारेच जाणतात. मात्र अनेकही असे बिझनेस आहेत ज्याच्या बद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की अखेर धोनी कोणकोणते बिझनेस करतो. यातून कोट्यावधीची कमाई होते.

हे तर साऱ्यांनाच माहीत आहे की शेतीचा बिझनेस त्याने सुरू केला आहे. याशिवाय seven नावाचा कपड्यांचा ब्रांड तो चालवतो. याशिवाय कोट्यावधीच्या जाहिरातींच्या डीलही त्याच्याकडे आहेत. यातूनच कमाई होते. तसेच अनेक असे बिझनेस आहेत जे दरवर्षी कोट्यावधीची कमाई करून देतात.

हॉटेलचा बिझनेस

महेंद्रसिंग धोनी स्वत:चे हॉटेलही चालवतो. हे ५ स्टार हॉटेल तर नाही मात्र येथे थांबण्यासाठी बरेचजण उत्सुक असतात. हे हॉटेल रांचीमध्ये आहे. याचे नाव हॉटले माही रेसिडन्सी आहे.

बंगळुरूमध्ये चालवतो शाळा

धोनीने मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासोबत मिळून बंगळुरूमध्ये एमएस धोनी ग्लोबल शाळा सुरू केली आहे. इंग्लिश मीडियमच्या या शाळेत सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकवला जातो. यात तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शनाने अभ्यासक्रम तयार केला जातो.

धोनीचे चॉकलेट

महेंद्रसिंग धोनीने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. त्याने 7Ink Brews मध्येही गुंतवणूक केली आहे. हा एक बेवरेज ब्रँड आहे. याशिवाय चॉकलेट कंपनीमध्येही त्याने पैसा लावला आहे जे कॉप्टर ७ या नावाने बाजारात चॉकलेट विकतात.

Comments
Add Comment