Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीVideo: दार बंद करताच डिलीव्हरी बॉयने केलं असं..., सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला...

Video: दार बंद करताच डिलीव्हरी बॉयने केलं असं…, सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला व्हिडीओ

Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा सीसीटिव्ही कॅमेरात कैद झालेले व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक स्विगी डिलीव्हरी बॉय चक्क शूज चोरताना दिसत आहे. ही घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. जर तुम्ही ऑनलाईन काही मागवत असाल तर डिलीव्हरी बॉयपासून सावध राहा. अशा प्रकारची चोरी तुमच्या घरी पण होऊ शकते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ९ एप्रिलचा असून ही घटना गुरुग्राम परिसरातील एका इमारतीत घडली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला डिलीव्हरी बॉय पायऱ्या चढताना दिसतो. तो एका फ्लॅटच्या दरवाज्यासमोर जातो आणि बेल वाजवतो. दरवाजा उघडेपर्यंत तो तेथे ठेवलेल्या चप्पलांवर नजर फिरवतो. त्यानंतर एक महिला दरवाजा उघडते. पार्सल दिल्यानंतर पायऱ्यांनी खाली उतरुन कोणी नसल्याची खात्री करतो.त्यानंतर डोक्यावर बांधलेला रुमाल काढतो. आणि फ्लॅटच्या बाहेर ठेवलेले शूज उचलून रुमालमध्ये लपवत तिथुन पळ काढतो. हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -