Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीन झालेल्या आजारावरही केले उपचार, पदरी पडले त्याचे भयानक परिणाम!

न झालेल्या आजारावरही केले उपचार, पदरी पडले त्याचे भयानक परिणाम!

रुग्णालयाचा निष्काळजीपणा पडला महागात!

वॉशिंग्टन : अमेरिका टेक्सासमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वास्तविक येथील एका महिलेच्या पॅथॉलॉजी रिपोर्टमध्ये ती कॅन्सर ग्रस्त असल्याचे समोर आले होते. त्यानंतर महिलेवर केमोथेरपी उपचार सुरू करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या महिलेला कॅन्सर झाला नसल्याचे आता उघडकीस आले आहे. न झालेल्या आजारावर उपचार केल्यामुळे पीडित महिलेला त्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागत आहेत.

अमेरिकन माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लिसा मोंक (३९) असे महिलेचे नाव असून २०२२ मध्ये ती पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल झाली होती. किडनी स्टोनच्या समस्येमुळे हा त्रास होत असल्याची महिलेला शंका होती. तर चाचणी अहवालात किडनी स्टोन असल्याचेही समोर आले, परंतु महिलेची प्लीहा (Spleen) मोठी झाल्याचे आढळून आले. यानंतर गेल्या वर्षी जानेवारीमध्ये महिलेच्या प्लीहावर शस्त्रक्रिया करून अतिरिक्त भाग काढण्यात आला. शस्त्रक्रियेतून काढलेला प्लीहाचा अतिरिक्त भाग तपासणीसाठी पाठवण्यात आला. तीन ठिकाणी पाठवण्यात आलेल्या पॅथॉलॉजी लॅबच्या अहवालात योग्य माहिती मिळू शकली नाही, तेव्हा त्याला चौथ्या लॅबमध्ये पाठवण्यात आले, तेथे या महिलेला कॅन्सर असल्याचे सांगण्यात आले.

महिला कॅन्सरग्रस्त आहे असं समजल्यामुळे रुग्णालयात महिलेची केमोथेरपी (Chemotherapy) सुरू करण्यात आली. मात्र, केमोथेरपीचे उपचार घेतल्याने या महिलेच्या डोक्यावरील सर्व केस गळून गेले आहेत. त्याचबरोबर महिलेची त्वचाही खराब झाली आहे. एप्रिलमध्ये जेव्हा ही महिला नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेली असता तिला कर्करोग नाही आणि ती ठीक आहे, असे सांगण्यात आले. ही बातमी ऐकून महिलेला आश्चर्य वाटले. या प्रकरणात रुग्णालयाने अत्यंत निष्काळजीपणा दाखवला आहे. तिच्या दुसऱ्या केमोथेरपीपूर्वीच लॅबचा रिपोर्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता, पण हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रिपोर्टकडेही पाहिले नाही आणि तिला केमोथेरपी उपचार देण्यात आले, असे महिलेचे म्हणणे आहे. डॉक्टरांच्या आणि रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे या महिलेला जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही या गोष्टीचा थरकाप उडाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -