Thursday, July 10, 2025

Transgender: पुण्यात तृतीयपंथांच्या गैरवागणुकीवर नवी नियमावली जाहीर

Transgender: पुण्यात तृतीयपंथांच्या गैरवागणुकीवर नवी नियमावली जाहीर

'हे' असणार नियम


पुणे : अनेक ठिकाणी तृतीयपंथी नागरिकांकडून जबरदस्तीने पैशांची मागणी करतात. रेल्वे, रस्ते, लग्न समारंभ, विविध सण, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, बारसे, नामकरण विधी अशा बऱ्याच कार्यक्रमात जाऊन तृतीयपंथीयांकडून पैशांची मागणी केली जाते. मात्र आता अशा वागणुकीमुळे पुण्यातील वाहतूक शाखा,पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि बीट मार्शलकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


पुणे शहरातील चौकांमध्ये सिग्नलला आणि धार्मिक कार्यक्रमात घरी जाऊन नागरिकांकडे जबरदस्तीने पैशांची मागणी करणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त यांनी दिले आहेत. निमंत्रण नसताना बऱ्याचदा पैशांसाठी जबरदस्ती केली जाते. शहरातील मुख्य चौकांमध्ये, बाजारपेठांमध्ये तृतीयपंथीयांकडून वाहनचालक आणि नागरिकांना पैशांसाठी त्रास देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून नियमावली तयार करण्यात आली आहे.



हे आहेत नियम



  •  तृतीयपंथीयांना नागरिकांच्या घरी आणि दुकानांमध्ये जाऊन जबरदस्तीने पैसे मागण्यास मनाई राहील.

  • लग्न, बारसे, अंत्यविधी, उत्सव अशा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये निमंत्रणाशिवाय जाता येणार नाही.

  • मुख्य चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पैशांची मागणी केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.


तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. भिक्षेकऱ्यांकडून लहान मुलांचा वापर करणे गंभीर गुन्हा आहे. अशा भिक्षेकऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त यांनी दिला.
Comments
Add Comment