मोदींची वक्रदृष्टी पडली तर तोंडाला फेस येईल

  105

मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला उबाठाला टोला


पुणे : 'काही लोक घरात बसून फेसबुक लाईव्ह करायचे आणि आता ते पंतप्रधान मोदींवर टीका करतात. आता मोदींची वक्रदृष्टी जर यांच्यावर पडली तर फेसबुकवर बोलणाऱ्याच्या तोंडाला फेस येईल. बोलताना जरा भान बाळगा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले.


पुण्यात आज महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यासोबतच त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली.


‘नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेले काम हे काँग्रेसला मागील ५० वर्षात जे जमले नाही ते काम केले आहे. जगात देशाची प्रतिमा उंचावली असून देश बोलतो ते जग ऐकत आहे असे वातावरण आहे. कोरोना काळात काही लोक घरात बसून होते ते नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहे.


कार्यकर्ता ज्यावेळी सक्रिय होतो, तेव्हा सर्वत्र राज्यात महायुती वातावरण दिसून येत आहे. आता मनसेने आपल्याला पाठिंबा दिला आहे, आपली ताकद मोठी आहे. आपल्या महायुतीचे वातावरण राज्यभर आहे. पुणे लोकसभेचे उमदेवार मुरलीधर मोहोळ आणि इतर आपले सगळे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, कारण आपले कार्यकर्ते चार्ज आहेत.गेल्या ३० वर्षांपासून आपली नैसर्गिक युती आहे. त्यामध्ये काही विघ्न आली, पण आपण पुन्हा युती केली आणि आता अजित पवार सोबत आले. आपली महायुती मजबूत झाली. अनेक लोक म्हणत होते की सरकार पडणार पडणार, आता बंद झालं आहे असं म्हणणं. आता तर मनसेनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आपली ताकद वाढली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला