Thursday, July 4, 2024
Homeनिवडणूक २०२४मोदींची वक्रदृष्टी पडली तर तोंडाला फेस येईल

मोदींची वक्रदृष्टी पडली तर तोंडाला फेस येईल

मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला उबाठाला टोला

पुणे : ‘काही लोक घरात बसून फेसबुक लाईव्ह करायचे आणि आता ते पंतप्रधान मोदींवर टीका करतात. आता मोदींची वक्रदृष्टी जर यांच्यावर पडली तर फेसबुकवर बोलणाऱ्याच्या तोंडाला फेस येईल. बोलताना जरा भान बाळगा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले.

पुण्यात आज महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यासोबतच त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली.

‘नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेले काम हे काँग्रेसला मागील ५० वर्षात जे जमले नाही ते काम केले आहे. जगात देशाची प्रतिमा उंचावली असून देश बोलतो ते जग ऐकत आहे असे वातावरण आहे. कोरोना काळात काही लोक घरात बसून होते ते नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहे.

कार्यकर्ता ज्यावेळी सक्रिय होतो, तेव्हा सर्वत्र राज्यात महायुती वातावरण दिसून येत आहे. आता मनसेने आपल्याला पाठिंबा दिला आहे, आपली ताकद मोठी आहे. आपल्या महायुतीचे वातावरण राज्यभर आहे. पुणे लोकसभेचे उमदेवार मुरलीधर मोहोळ आणि इतर आपले सगळे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, कारण आपले कार्यकर्ते चार्ज आहेत.गेल्या ३० वर्षांपासून आपली नैसर्गिक युती आहे. त्यामध्ये काही विघ्न आली, पण आपण पुन्हा युती केली आणि आता अजित पवार सोबत आले. आपली महायुती मजबूत झाली. अनेक लोक म्हणत होते की सरकार पडणार पडणार, आता बंद झालं आहे असं म्हणणं. आता तर मनसेनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आपली ताकद वाढली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -