Monday, October 27, 2025
Happy Diwali

MI Vs RCB: विराट कोहलीवर नेहमीच भारी रोहित शर्मा, आज होणार सामना

MI Vs RCB: विराट कोहलीवर नेहमीच भारी रोहित शर्मा, आज होणार सामना

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळवला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरूवात होईल.

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात बंगळुरूच्या संघाने गेले ३ सामने हरले आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या ५ सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवला. दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईच्या संघाने ४ पैकी केवळ एक सामना जिंकला आहे. अशातच हा सामना जिंकून दोन्ही संघ पॉईंट्स टेबलमध्ये आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतील.

RCBपेक्षा मुंबई सरस

विराट कोहलीच्या संघापेक्षा नेहमीच रोहित शर्माचा मुंबईचा संघ सरस ठरला आहे. दोन्ही संघादरम्यान आतापर्यंत ३४ सामने रंगलेत. त्यातील २० सामन्यांमध्ये मुंबईने विजय मिळवला. तर १४ सामन्यात बंगळुरूला विजय मिळवता आला. मात्र मागील ५ सामने पाहिल्यास यात आरसीबीचे पारडे जड दिसते. गेल्या ५ सामन्यांपैकी आरसीबीने ४ सामने जिंकलेत.

अशी असू शकते प्लेईंग ११

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या(कर्णधार), तिलक वर्मा, टीम डेविड, रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्जी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, फाफ डू प्लेसिस(कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, सौरव चौहान, कॅमरून ग्रीन, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, रीस टॉपली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >