
हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ....
मुरूड(संतोष रांजणकर)- मुरूड डोंगरी सुभा येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठात प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.
मुरूड डोंगरी-सुभा येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठात आज चैत्र शुद्ध द्वितीयेला महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने या मठाच्या अधिपती गुरू माऊली सौ त्रिशा दत्तात्रेय पाटील यांनी गेली अठरा वर्षे हा सोहळा साजरा करत आहेत.
या निमित्ताने मठात पहाटे पासून महाराजांना अभिषेक विधीवत पूजन करून दिवसभर नामस्मरण दुपारी महाआरती व महाप्रसाद करण्यात आला होता. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.