Saturday, May 24, 2025

ताज्या घडामोडी

LokSabha Election 2024: भाजपा उमेदवारांची ११ वी यादी जाहीर!

LokSabha Election 2024: भाजपा उमेदवारांची ११ वी यादी जाहीर!

'या' जागांचा सस्पेन्स अजूनही कायम


मुंबई : देशात लोकसभा निवडणूक (LokSabha Election 2024) एकूण सात टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या १९ एप्रिल रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. निवडणुकीला ८ दिवस बाकी असून भाजपा उमेदवारांची ११ वी यादी (BJP Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील एकाच उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून अद्यापही महाराष्ट्रातील काही जागांचा सस्पेन्स कायम आहे.


भारतीय जनता पक्षाकडून (BJP) लोकसभा उमेदवारांची ११ वी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकाच उमेदवाराची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील भदोही लोकसभा मतदारसंघातून डॉ. विनोद कुमार बिंद यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाने आतापर्यंत उत्तर प्रदेशातील ७१ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे अजूनही कैसरगंज, रायबरेली, देवरिया आणि फिरोजाबाद लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे.


दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत महाराष्ट्रातील सातारा आणि रत्नागिरी या लोकसभा मतदार संघाचा समावेश नाही. त्यामुळे अजूनही या जागांचा सस्पेन्स कायम आहे.

Comments
Add Comment