मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) मुंबई इंडियन्स(mumbai indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(royal challengers bangalore) यांच्यातील सामना रोहित शर्मा आणि विराट कोहली असा पाहिला जात होता. मात्र जसप्रीत बुमराहने मध्येच एंट्री घेत हा सामना अधिक रोमांचक केला. सुपर फॉर्मात असलेला विराट कोहली गुरूवारी बुमराहसमोर अगदीच असहाय्य दिसला.
विराट कोहली मुंबई इंडियन्सविरुद्ध केवळ ३ धावा करून बाद झाला. त्याला या ३ धावा करण्यासाठी ९ बॉलचा सामना करावा लागा. या सामन्यात विराट फॉर्मात दिसत नव्हता. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये मोहम्मद नबीचे तीन बॉल खेळले आणि केवळ दोन धावा केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्येही त्याला एक धाव करण्यासाठी तीन बॉल खेळावे लागले.
Boom Boom Bumrah!@Jaspritbumrah93 comes into the attack and gets the big wicket of Virat Kohli.
Live – https://t.co/7yWt2uizTf #TATAIPL #IPL2024 #MIvRCB pic.twitter.com/1QbRGjV2L0
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
तिसऱ्या ओव्हरमध्ये जसप्रीत आला. या ओव्हरमध्ये कोहली पहिल्या दोन बॉलवर एकही धाव करू शकला नाही. दुसरा बॉल तर एलबीडब्लू झाला. दरम्यान बॉल लेग स्टंप मिस करत होता आणि अंपायरने आऊट दिले नाही. ओव्हरचा तिसरा बॉल गुड लेंथ होता. त्यावर विराटने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला मात्र विराट शॉट खेळण्याच्या स्थितीत नव्हता आणि बॉल त्याच्या बॅटच्या इनसाईड एजला घेऊन इशान किशनच्या हातात गेला.
या पद्धतीने विराट कोहली मुंबई इंडियन्सविरुद्ध ९ बॉलवर ३ धावा करून बाद झाला. हा आयपीएल २०२४मधील त्याचा सर्वात कमी स्कोर आहे. विराटने या स्पर्धेत अनुक्रमे २१, ७७, नाबाद ८३, २२, नाबाद ११३ धावांची खेळी केली होती.