मुंबई: ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे योग्य वेळेत झाले पाहिजे. तेव्हाच त्याचा संपूर्ण लाभ आपल्या शरीराला मिळतो. आपल्या खाण्याच्या सवयीमध्ये बदल करून तुम्ही आजारांपासून स्वत:चा बचाव करू शकता. आरोग्य तज्ञांच्या मते तुम्ही जर खाण्यापिण्याच्या सवयीत बदल कराल तर लठ्ठपणा, डायबिटीज, पोटाशी संबंधिक अनेक आजारांपासून दूर राहाल. यासाठी प्रत्येकाने दिवसातील तीन वेळा खाण्याच्या वेळेवर अधिक लक्ष दिले पाहिजे.
जेवणाची योग्य वेळ काय आहे?
तज्ञांच्या मते, सकाळचा ब्रेकफास्ट आरोग्यासाठी अतिशय गरजेचा आहे. याचा संपूर्ण फायदा उचलला पाहिजे त्यामुळे सकाळी वेळेत नाश्ता केला पाहिजे. यासाठी योग्य वेळ सकाळी ७ ते ८ इतकी आहे. सकाळी १० नंतर ब्रेकफास्ट करू नये. सकाळी उठल्यावर अर्ध्या तासाच्या आत काही ना काही खाल्लेच पाहिजे.
लंचची योग्य वेळ
दुपारी खाण्याचीही एक वेळ असते. या वेळेनंतर जर लंच केला तर शारिरीक समस्या वाढतात. लंचची योग्य वेळ दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत आहे. यात ब्रेकफास्ट आणि लंच यांच्यात चांगली गॅप मिळते. संध्याकाळई ४ नंतर कधीही जेऊ नये. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचते.
रात्रीचे जेवण कधी घ्यावे?
जर तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर रात्रीचे जेवळ संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत केले पाहिजे. रात्री ९ नंतर जेऊ नये. झोपण्याच्या ३ तास आधी खाल्ले पाहिजे.