Sunday, August 31, 2025

अमेरिकेत ईद साजरी करताना दोन गटांत गोळीबार

अमेरिकेत ईद साजरी करताना दोन गटांत गोळीबार

वॉशिंग्टन : काल मुस्लीम समुदायाचा ईद - उल - फित्र अर्थात रमझान ईद हा सण साजरा करण्यासाठी अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे जमलेल्या लोकांवर गोळीबार झाला. या घटनेत ३ जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये एका १५ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. पोलिसांना या मुलाकडे एक बंदूक सापडली.

फिलाडेल्फियामधील क्लारा मोहम्मद स्क्वेअर येथील मशिदीजवळ गुरुवारी (भारतीय वेळेनुसार गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजता) रमजान उत्सवाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला प्रशासनाच्या म्हणण्यानुसार अंदाजे एक हजार लोक उपस्थित होते. अचानक दोन गटांमध्ये गोळीबार सुरू झाला. गोळीबाराचा आवाज येताच चेंगराचेंगरी झाली.

लोक जवळच्या पार्क, शाळा आणि मशिदीकडे धावू लागले. गोळीबार टाळण्यासाठी काही लोक झाडांच्या मागे लपले. सुमारे ३० गोळ्या यावेळी झाडण्यात आल्या. यात १५ वर्षीय संशयितासह एक पुरुष आणि एक मुलगी जखमी झाली. गोळीबार करणाऱ्या गटांची माहिती आणि गोळीबाराचे कारण समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Comments
Add Comment