नवी दिल्ली: ईदचा सण संपूर्ण देशभरात आज उत्साहात साजरा केला जात आहे. बंधुता आणि एकतेचे प्रतीक असलेला हा सण देशभरातील मुस्लिम बांधव उत्साहात आणि आनंदाने साजरा करतात. ईदच्या निमित्ताने देशातील विविध भागात लोक मशिदीत जाऊन नमाज पठण करतात. या निमित्तीने दिल्लीस्थित मशिदीत लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लोक एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देत आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये ईदचा सण मोठ्या जोशाने आणि उत्साहात साजरा केला जात आहे. जम्मू-काश्मीरपासून ते दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये या सणाची धूम आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ईद निमित्त दिल्लीच्या काश्मीरी गेट स्थित पंजा शऱीफ दर्गा येथे जात ईदचे नमाज पठण केले.
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा
याआधी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईदच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या
President Droupadi Murmu tweets, “I wish all my countrymen, especially my Muslim brothers and sisters, a very happy Eid-ul-Fitr. This festival, celebrated after the holy month of Ramzan, spreads the spirit of unity, harmony and brotherhood. This festival of sharing happiness… pic.twitter.com/d697WvCVTQ
— ANI (@ANI) April 11, 2024
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासियांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.
दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत उत्साह
ईदचा उत्साह दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत बघायला मिळत आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मशिदीमध्ये नमाज पठणासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. येथे मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले. मुंबईतही मुस्लिम समुदायाच्या लोकांना मशिदीमध्ये जात नमाज पठण केले.