Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीSalman Khan: भाईजान सलमान खानची चाहत्यांना खास 'ईदी'

Salman Khan: भाईजान सलमान खानची चाहत्यांना खास ‘ईदी’

आगामी चित्रपटाची केली घोषणा

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि ईद हे समीकरण गेली बरीच वर्ष बॉलिवूडमध्ये (Bollywood) पाहायला मिळतं. दरवर्षी ईदच्या दिवशी सलमान खान त्याच्या चाहत्यांना चित्रपटाची ट्रीट देतो. यंदा ईदनिमित्त कोणताही चित्रपट रिलीज झाला नसल्यामुळे चाहत्यांनी नाराजीचा सूर मारला होता. पण, सलमानने ईदनिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. त्याने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने दिलेल्या या अनोख्या ईदीमुळे चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

ईदच्या खास मुहूर्तावर सलमान खानने ‘सिकंदर’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात सलमान, साजिद नाडियादवाला आणि दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास हे तीन दिग्गज एकत्र येणार आहेत. सलमान खान आणि साजिद नाडियादवाला यांनी एकत्र सिनेमा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्या जोडीने ‘जुडवा’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘किक’ आणि असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तर ए.आर. मुरुगदास हे त्यांच्या गजनी, हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यांचा सिकंदर हा चित्रपट देखील हिट होणार का? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.

सलमानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या सिकंदर या चित्रपटाची घोषणा केली आहे. सलमानने पोस्टमध्ये लिहिलं, “इस ईद ‘बड़े मियां छोटे मियां’ और ‘मैदान’ को देखो और अगली ईद सिकंदर से आ कर मिलो… आप सभी को ईद मुबारक!” सलमानच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘सिकंदर’ पुढील वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, सिकंदर व्यतिरिक्त, किक 2, पठाण वर्सेज टायगर हे देखील सलमानचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -