Wednesday, May 14, 2025

ताज्या घडामोडी

Apple Company: युवकांसाठी मोठी संधी! 'ही' कंपनी देणार ५ लाख नोकऱ्या

Apple Company: युवकांसाठी मोठी संधी! 'ही' कंपनी देणार ५ लाख नोकऱ्या

मुंबई : रोजगाराच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. युवकांसाठी एका मोठ्या कंपनीत नोकरीची संधी मिळणार असल्यामुळे आता दिलासा मिळणार आहे. आयफोन निर्मिती ॲपल कंपनीमध्ये लाखो नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या तीन वर्षात ॲपल कंपनीमध्ये पाच लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत.


तब्बल पाच लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याने भारतातील नोकऱ्यांची संख्या तीन पटीनं वाढणार आहे. ॲपल कंपनी भारतात अधिक गुंतवणूक करुन आपलं उत्पादन झपाट्याने वाढवणार असल्याचा विचार करत आहे. कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संदर्भाने हालचीलांना देखील वेग आला आहे.



आयफोन उत्पादनात २५ टक्के वाढ होण्याची शक्यता


मिळालेल्या माहितीनुसार, ॲपल कंपनी पुढील तीन वर्षात भारतात पाच लाख नोकऱ्या देणार आहे. यामुळे ॲपल कंपनी संबधीत कर्मचाऱ्यांच्या संख्येत तीन पटीने वाढ होणार आहे. तर या निर्णयामुळे अप्रत्यक्ष रोजगारातही वाढ होणार असल्याचे कळते. सध्या जगातील एकूण आयफोन उत्पादनापैकी ७ आयफोन हे भारतात तयार होतात. २०३० पर्यंत याची संख्या २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ही तरुणांसाठी मोठी संधी असणार आहे.


आठवडाभरापूर्वी ॲपल कंपनीने कॅलिफोर्नियामधील ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प बंद केल्याप्रकरणी काढून टाकले होते. मात्र आता ॲपल कंपनीला भारतातील उत्पादन वाढवायचे असून व्यवसायाचा या ठिकाणी मोठा विस्तार करायचा आहे. त्यामुळे ही कंपनी भारतातील युवकांसाठी ५लाख नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देणार आहे. ज्या युवकांना ॲपल कंपनीमध्ये काम करायचे आहे, त्यांची इच्छा आता पूर्ण होण्यास मदत होणार आहे.


Comments
Add Comment