water shortage: रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई आता पोहोचली शाळांपर्यंत

  43

पाणी नाही, तर दुपारचे जेवणही नाही; ८ दिवसांपासून जिल्हा परिषद शाळेत चूल पेटली नाही


अलिबाग : रायगडमधील पाणीटंचाईची झळ आता शाळांपर्यंत पोहोचली आहे. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नेहुली शाळेत पाणी नसल्याचे कारण देत शाळेत माध्यान्ह भोजन शिजले नाही. त्यामुळे आठवड्यापासून विद्यार्थ्यांना घरून डबा घेऊन जावे लागत आहे. निवडणुकीची धामधूम सुरु असल्याने या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना वेळ मिळालेला नाही. खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत नेहुली गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत १६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या गावात अनेक वर्षांपासून पाणी समस्या आहे.


एमआयडीसीमार्फत गावात पाणीपुरवठा होत असतो. मात्र, सध्या पंधरा दिवसांनी एकदा पाणी मिळत आहे. तर खासगी वाहिनीवरून सध्या ग्रामस्थ पाणी घेत आहेत. शाळेतही पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. मात्र, सध्या शाळेत पाणी येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. आठवडाभर विद्यार्थी आणताहेत घरून डबागेल्या आठवड्यापासून शाळेत पाणी नसल्याने अन्न शिजविण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे माध्यान्ह भोजन बंद झाले आहे. विद्यार्थी सध्या शाळेत येताना घरून डबा घेऊन येत आहेत.



प्रशासन अनभिज्ञ


संबंधित समस्येबाबत शाळा व्यवस्थापनाने शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना कोणतीही माहिती दिलेली नाही. याबाबत शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना संपर्क केला असता माहिती घेते, असे म्हणाल्या. तर अलिबागच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी