Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाIPL 2024IPL 2024 च्या मध्येच बदलू शकतो या संघाचा कर्णधार? आकाश चोप्राने कोणाकडे...

IPL 2024 च्या मध्येच बदलू शकतो या संघाचा कर्णधार? आकाश चोप्राने कोणाकडे केला इशारा

मुंबई: आयपीएल २०२४च्या हंगामातील एक तृतीयांश सामने पार पडले आहे. या हंगामात आतापर्यंत २३ सामने खेळवले गेले आहेत. २४वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या २३ सामन्यानंतर जर प्लेऑफचे चित्र पाहण्याचा प्रयत्न केला तर राजस्थान रॉयल्सचा संघ चांगल्या स्थितीत आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांची स्थिती अतिशय खराब आहे.

यातच आकाश चोप्रा यांचे एक ट्वीट व्हायरल होत आहे यात आयपीएल २०२४च्या मध्येत कर्णधार बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आकाश चोप्रा यांचे हे ट्वीट १३ फेब्रुवारीचे आहे. यात त्यांनी लिहिले होते की, मला असे का वाटते की आयपीएलच्या या हंगामाच्या मध्येच एक संघ कर्णधार बदलेल? होईल का? वाट पाहूया. आकाश चोप्रा यांनी आपले हे ट्वीट एप्रिलमध्ये रिट्वीट केले. याबाबत लिहिले, आपण प्रत्येक सामन्यागणिक या बदलाच्या जवळ येत आहोत का?

आकाश चोप्राने पोस्टवर फॅन्सला अनेक उत्तरे दिली आहेत. अधिकतर चाहत्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याच कारणामुळे दोन्ही संघाची स्पर्धेतील आतापर्यंतची खराब कामगिरी झाली आहे.

काही युजर्सनी लिहिले की आरसीबी फाफ डू प्लेसिसला हटवून विराट कोहलीला पुन्हा कर्णधार बनवू शकते. तर रोहित शर्माच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पुनरागमन होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२४मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. या संघाने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांपैकी एक सामना जिंकला आहे. बाकी तीन सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला. मुंबई इंडियन्स आयपीएल २०२४च्या पॉईंट टेबलमध्ये ८व्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एका विजयासह पॉईंट टेबलमध्ये ९व्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -